पान:वामनपंडित १८८४.pdf/७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ७५ ) नानें जो आनंद होईल त्याचें महत्व फारच अधिक आहे हें सांगावयास नको. तसें ईश्वरदत्त कविता प्रसवण्या- ची बुद्धि, उभय प्रकारच्या कवींस सारखीच असते; परंतु पहिल्यास शास्त्र कौशल्यादि शिक्षण नसते आणि दुसन्यास तें असतें, इतका फरक असतो. तेव्हां शिक्षि- त लोकांनी केलेल्या कार्यापासून होणारा आनंद, अ- शिक्षित लोकांनी केलेल्या कार्यापासून होणाऱ्या आ- नंदापेक्षां खचित अधिकच होईल. अर्थात् तत्वदृष्टी- नेंही अकृत्रिमकवितेपेक्षां कृत्रिमकाव्य चांगलें असें ! सिद्ध होतें. वर दोन प्रकारांची परस्पर तुलना करून पाहिली; त्यावरून स्पष्टच झालें कीं, राहिलेली तिसऱ्या प्रकार- ची कविता मध्यमांत गणिली जाईल. वामनपंडिताची संपूर्ण कविता, वर सांगितलेल्या को- णत्या एकाच वर्गांत घालतां येईल असे वाटत नाहीं. कारण भामाविलास, भीष्मयुद्ध, रुक्मिणीविलास, सीता- स्वयंवर, भरतभाव, हरिविलास, नामसुधा, ब्रह्मस्तुति इ- त्यादि प्रकरणांतील पुष्कळ पधें फार चांगलीं साधलीं आहेत. यास्तव त्यांची उत्तम काव्यांत गणना कराव यास कांही हरकत नाहीं. माधुर्य व प्रसाद या गुणांत तर वामनाची वरील कविता मोरोपंताच्या काव्यापेक्षां पु- एकळ चांगली आहे असें आह्मास वाटतें. याविषयीं वि- शेष विचार मोरोपंत आणि वामनपंडित ह्यांच्या तुलना- प्रकरणांत करितां येईल. तुकारामाप्रमाणें वामनाच्या मनाचा मूर्तिमंत ओघच कविता बनला. असें यथार्थदीपिकेशिवाय दुसरे कोण -