पान:वामनपंडित १८८४.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ४ ) पाहून तसेंच दुसरा, तिसरा, याप्रमाणे करूं लागले; यामुळे ईश्वरप्राप्तीच्या हेतुहून अन्य प्रकारचें शृंगारादि वर्णन ज्यांत केले आहे असे गद्यपद्यात्मकग्रंथ करण्याची कल्पना कोणाच्या मनांत आली नसावी. अथवा ईश्वरगुण- वर्णनावांचून काव्यादि ग्रंथ करणे फार गौणकृत्य आहे अशा समजुतीवर ते कोणी केले नसावे असे वाटतें. वामनपंडित व त्याच्या पूर्वी होऊन गेलेले महाराष्ट्र ग्रंथकार यांतून कोणाच्याही विचारांत परलोकसाधना- खेरीज दुसरें तत्त्व सांपडत नाहीं. फार तर काय, पण भारत, रामायणांतील अनेक रसयुक्त धीरोदात्त पुरु- पांची चरित्रें महाराष्ट्रकवींनीं गाइलीं नसती तर महा- राष्ट्र लोकांत जी थोडीबहुत वीरश्री आढळून येत्ये तिचें बीजही राहिलें नसतें असें आह्मांस वाटतें. आतां ही चरित्रेंही परलोकसाधन ह्मणूनच कवींनीं रचिलीं आहेत; तथापि चरित्रसंबंधानें शृंगारवीरादि रस, नी- तिशास्त्र व तर्कशास्त्र ह्यांचा त्यामध्यें अनायासें संग्रह झाला आहे. असो. महाराष्ट्रभाषेंत मुकुंदराज, ज्ञानेश्वर, नामदेव, एक- नाथ, रामदास, तुकाराम, वामनपंडित, मुक्तेश्वर, श्रीधर, मोरोपंत, रघुनाथपंडितप्रभृति जे ग्रंथकार व कवी झाले; त्यांतून मुकुंदराज, ज्ञानेश्वर, एकनाथ, नामदेव, तुका- राम, रामदास, यांस तर ईश्वरी अवतार व जीवन्मुक्त मानितात, व बाकीच्या ग्रंथकारांत वामनपंडित ब्रह्मनिष्ठ असून श्रीधरादि मुमुक्षु होते असें दिसतें. ज्ञानेश्वर दि - कांतील अवतारकल्पना सोडून पाहिलें तर वामनपंडित हा सर्वांत अग्रगण्य दिसतो. कारण आत्मज्ञान, वै.