पान:वामनपंडित १८८४.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमंत वाचवालय, हेद विताग्रंथ लिहिलेला आढळत नाहीं. त्या आलीकडील काळांत बरेच ग्रंथकार झाले आहेत. पण त्या सर्वांचा वर्णनीय विषय ईश्वरभक्ति, वैराग्य, मोक्ष इत्यादि पर- मार्थसाधनाचा बहुतकरून असल्यामुळे परलोक साधक अशा वृद्धलोकांच्या समाधानास मात्र तो पात्र झाला आहे. वस्तुतः ज्यांनी नुकताच विषयानुभव घेण्यास आरंभ केला आहे, ज्यांचे कामक्रोधादि विकार केवल बाल्यावस्थेत असून शृंगारादि रससेवनाविषयीं जे आ पसरून बसले आहेत, अशा तरुणजनसमूहास शृंगा- रादि रसांनी पूरित असें काव्यामृत पान करण्यास मिळ- ण्याची त्यापासून आशाच नको. हिंदुस्थानांत व वि शेषेकरून महाराष्ट्रभाषेंतील ग्रंथकारांत पारलौकिक विचार करणारेच पुष्कळं झाले, व एकानें जें केलें तें अनेक ग्रंथ लिहिले असतील; परंतु छापखाना, राजाश्रय, शांतता यांचा अभाव इत्यादि गैरसोईमुळे, राज्यांच्या भयंकर व निरंतरच्या घडामोडीमुळे, मुसलमानांचे जुलमी अंमल व त्या योगानें देशाची दुर्दशा इत्यादि कारणांनीं तशा जुन्या ग्रंथांचा मागमूसही उरला नसावा असें वाटतें. वस्तुतः महाराष्ट्रभाषा अति जुनाट आहे असा तर्क होतो. १ थोड्या कालापूर्वी होऊन गेलेल्या मराठे राज्यकर्त्यांच्या हकी- कतीच्या बखरी मराठी भाषेत लिहून ठेविलेल्या काव्येतिहाससंग्रह नांवाच्या मासिक पुस्तकांतून प्रसिद्ध होत असतात. त्यांतील वर्णन तपशीलवार व सत्य रीतीनें केलेले दिसतें. त्यांत अतिशयोक्ति नाहीं. तरी ह्या तपशीलवार लिहिलेल्या बखरी सरासरी चालू शतकांत किंवा गेल्या शतकाच्या अखेरीसच लिहिल्या गेल्या आहेत. यास्तव वा- मनपंडिताविषयीं विचार करीत असतांना मराठी भाषेत त्या वेळीं लौकिकविषयावर बहुतकरून ग्रंथ लिहिले जात नव्हते, असें म्हणावयास कांहीं हरकत दिसत नाहीं.