पान:वामनपंडित १८८४.pdf/७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ७४ ) बनविलेल्या ताजमहालासारख्या इमारतींत जाऊन उभे राहिलें असतां, इहलोकीं मी स्वर्गभुवनांतील मंदिराचाच सुखानुभव घेत आहे की काय असें कोणास वाटणार नाहीं !! त्या इमारतीचा भव्य देखावा, तिची अतिसूक्ष्म व मनोहर कारागिरी, दिव्य शोभायमान पाषाणादि द्र- व्यांची प्रमाणयुक्त जोडणी पाहून कल्पनेनें यथेच्छ मनां- त आणिलेलें मनोराज्यांतील ऐश्वर्य व सौंदर्य मूर्तिमंत झालें आहे काय ! असा तर्क कोणाच्या मनांत येणार नाहीं बरें !! अशी वैभवासह शोभा व कुशलता पाहिली ह्म- णजे तदर्शनानें जो आनंद होतो, त्यापुढें पर्वतादि स्व यंभू आकार विशिष्ट पदार्थदर्शनानें होणारा आनंद कांही कमी असावा; असें आह्मास वाटतें. महाकवींनी केलेल्या कृत्रिम काव्याच्या ही अतिशय आनंद होतो व तो रसिकांस अकृत्रिम क वितावलोकनापासून होणाऱ्या आनंदापेक्षा अधिक होत असतो यांत कांहीं संशय नाहीं. वाल्मीकीच्या अकृ. त्याप्रमाणेंच अवलोकनानें त्रिम कवितेपेक्षां, भवभूति, कालिदास, बाण, जगन्नाथ- राय, माघ इत्यादिकांचें कृत्रिमकाव्य आल्हादजनक अधिक आहे असें कोण ह्मणणार नाहीं ! रानटी मनु- ष्याच्या उत्तम कल्पनेपेक्षां श्रीहर्षाची कल्पना उदात्त व आल्हादजनक अधिक आहे असें झोंपत देखील कोण चावळणार नाहीं !! एक विनघडलेली संगमरवरी पाषाण आहे तो वस्तुतः दुर्मिळ, दर्शनीय आणि गुळगुळीत आ हे ह्मणून त्याच्या अवलोकनानें आनंदच होईल; तथापि त्या पाषाणावर एकाद्या कुशल कारागिराची टाकी ला- गून त्याची सुंदर मूर्ति बनल्यानंतर, तिच्या अवलोक-