पान:वामनपंडित १८८४.pdf/७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सौ. ग्रॅ. पं. यापनालय, - ( ७३ ) काव्यशुद्धि केली आहे असें त्याच्या कितीएक प्रकरणां- वरून दिसत नाहीं. आतां वरील वर्गांपैकी कोणत्या वर्गांतील कविता चां- गली ह्या प्रश्नाचा निर्णय ठरविला पाहिजे. तो वर दिलेल्या तीन प्रकारच्या उपमानांवरूनच चांगला ठर- वितां येईल. स्वयंभू पर्वतादि पदार्थ पाहिल्याबरोबर मनास कांहीं विलक्षण आनंद होतो. त्याची अतिवि- शालाकृति; अनियमित वळणांनीं पडलेल्या अव्यदया व झालेल्या वृक्षरचना; भव्य, शांत आणि उदात्त असा देखावा; गंभीरध्वनि, प्रतिध्वनि; पक्ष्यांचे मधुर मंजुल शब्द; स्वच्छ वायू व उदकांचे प्रवाह ह्या सर्वांचें एकीकरण म नावर झालें ह्मणजे विस्मयादि विकारांनी अंतःकरण वि स्तृत होऊन आनंद पावतें. त्याप्रमाणें अकृत्रिम कवितें- तील कल्पनाप्रवाहांचे लोटचे लोट स्वयंभू पाहिले ह्म- णजे अकृत्रिम मानसाची मूर्तिच पुढें उभी राहिली आ हे; ती गुणदोषांची पर्वा करित नाहीं; टीकाकाराकडे किं- वा दोष काढणाऱ्या दुर्जनाकडे ती ढुंकून पहात नाहीं; निर्गुण परपुरुषाकडे तिनें फेकलेले प्रेमरसपूरित लीला- कटाक्ष अवलोकन करून, गर्वपर्वतदुर्जनही द्रवीभूत होऊन क्षणभर सुलीनतेनें जिचें सेवन करित आहेत; जी आनंदांत निर्भय गायन करित आहे; पूर्वापर संगती- ची संगती धरित नाहीं; लीलाभरांत आडवेतिडवे पाहिजे तसे शब्दावयव चंचल करित आहे; असें पाहिले ह्मणजे तोही आनंद विलक्षणच होतो. उत्तम कारागिरानें बनविलेली मूर्ति किंवा इमारत ध्या. अतिशय द्रव्य, कुशलता आणि काल खर्च करून