पान:वामनपंडित १८८४.pdf/७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ७२ ) वृत्ते घेतली नसतीं, व शब्दालंकारावर अभिरुचि ठेविली • नसती, तर त्याच्या कवितेस अकृत्रिमत्वाची सुंदर शोभा आली असती. व जेथें दोषांचा अनादर व गुणांचा आ- दर ह्या गोष्टीची पर्वाच नाहीं, तेथें शब्दालंकाराच्या व कठिणवृत्तांच्या बंधनांत तरी रहावयाचें नेव्हते; तसें वामनानें केलें नाहीं. दुसरें दोषांचा त्याग व गु- णांचें ग्रहणही केलें नाहीं; यामुळे तिला कृत्रिमत्वाचें सौंदर्यही आलें नाहीं. आतां कधीं कधीं असे होतें कीं, कविता कशी असावी, तिचे गुण कोणते, दोष कोणते, हें सर्व उत्तम रीतीनें समजण्याची एकाद्यास शक्ति असते; परंतु त्याप्रमाणें स्वतां त्यास काव्य वनवितां येत नाहीं; अशी उदाहरणें पुष्कळच सांपडतील. काव्य बनविण्यास कांहीं स्वाभा- विक शक्तिच असली पाहिजे ही गोष्ट जगन्मान्य आहे. दुसरें, स्वतांच्या कवितेचे अथवा ग्रंथाचे दोष ह्मणून ज्याचे त्यास दिसत नाहींत. कदाचित् त्यांच्या स्थूल- त्वामुळें ते डोळ्यांसमोरच उभे राहिले आहेत असें वाटू लागलें तर, त्यांचा फारसा विचारच करावयाचा हीं; उलटें तो दोष नाहीं असा पक्षपात करावयाचा, असा मनोधर्म आहे. ना- तिसरें, आपण रचून तयार केलेले काव्य किंवा लि हिलेला ग्रंथ, पुनः पुनः तपासून शुद्ध करण्याचा किती- एकांस कंटाळा असतो. तेव्हां वामनपंडितास जरी चां- गलें काव्य करितां येत होतें, व कवितेचे गुणदोष समजत होते तरी, त्यानें आपणाकडून होईल तितकी