पान:वामनपंडित १८८४.pdf/७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ७१ ) ग 33 कृत्रिमरूप आपोआप व्यक्त होत आहे. आतां क वितेची कृत्रिमस्थिति चांगली किंवा अकृत्रिमस्थिति चांगली, हा प्रश्न एथें सहज उत्पन्न होतो. आणि त्या- चा विचार करणेंही प्रसंगोचित आहे. यास्तव आपण तिकडे वळू. प्रथम, वामनाची कविता केवळ तुकारामाच्या कवि- तेप्रमाणे मनांतून निघालेल्या कल्पनाओघाचा लोटच अशी बनली आहे, किंवा मोरोपंताच्या कवितेप्रमाणें त्या लोटास वारंवार पाहून पुनःपुनः मोडून घडून आ- पल्या व्यापकदृष्टीच्या पसंतीप्रमाणे बनविलेली आहे, ह्याचा निर्णय ठरविला पाहिजे. तुकारामाच्या अकृत्रिम वाणीची सर, वामनाची कविता करणार नाहीं व मोरो- पंताच्या उत्तम कारागिरीनें बनविलेल्या वाणीसही ती सर्वांशी पोहोचणार नाहीं; असे सूक्ष्मावलोकन केलें अ- सतां दिसून येतें. यास्तव यासंबंधानें असे तीन वर्ग क सरितां येतील. १ स्वयंभु पर्वतादि. २ कांहीं ओबड घोबड व भव्य असें कोरलेलें लेणें. ३ उत्तम कारागिरीनें बनविलेली मूर्ति किंवा इमारत. • यांत साधारणपणे पहिल्या वर्गांत तुकारामासार- ख्याची वाणी. दुसऱ्यांत वामनाची, आणि तिसऱ्यांत मोरोपंताची कविता घालितां येईल. वामनानें कठिण वृत्ते॑ घेतलीं; यमकांवर फार प्रीति ठेविली; दोषांची पर्वा केली नाहीं अथवा गुणांचा आ- दर केला नाहीं; यामुळे त्याच्या कवितेस सर्वत्र एकसा- रखी विशुद्ध कृति प्राप्त झाली नाहीं. जर त्यानें कठिण - KASHINATH G. MARATHE. Bran