पान:वामनपंडित १८८४.pdf/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ७० ) Vवामनाची वाणी मधुर, सरस आणि प्रौढ आहे, तरी व्याकरणशुद्धि, अर्थव्यक्ति, संमितत्व इत्यादि गुण तींत असावे तसे नाहींत. याविषयीं उदाहरणें पुढे देण्यांत येतील. व्याकरण शुद्ध व गुणालंकारांनी पूर्ण अशी भाषा लिहिण्याचें वामनपंडितास ठाऊक नव्हतें ह्मणून हीं वैगुण्यें त्याच्या कवितेंत राहिली असें कदापि ह्मणतां येणार नाहीं; तथापि ईश्वरसेवनानंदांत निमग्न होऊन निस्टहतेचा अंगीकार केल्यानंतरच वामनानें महाराष्ट्र- भाषाकाव्य रचिलें आहे. तेव्हां जनोपहासाची पर्वा न करितां त्यानें निर्जनाटवींतील मोकळ्या मनानें गायन करणाऱ्या पक्ष्याप्रमाणें आपला गुंजारवरूप काव्यबंध गाइला आहे. यामुळे ईश्वरनिर्मित पर्वत, नद्या, वृक्ष, पाषाण इत्यादि पदार्थांच्या अकृत्रिम आकाराप्रमाणें त्याची कविताही अकृत्रिमस्थितींतच राहिली असावी. असें अनुमान केलें तरी त्यास बाधक कारणे आहेतच. वामनाच्या कवितेस, अनुप्रासयमकादि प्रचुरशब्दालंकार व स्वभावोक्त्यादि अर्थालंकार यांनी पुष्कळ कृत्रिमत्व आले आहे. जेव्हां ग्रंथकारास किंवा कवीस जनोपहा- साचें भय असतें तेव्हां त्याचे ग्रंथ किंवा कविता कृ- त्रिमतेनें ठाकठिकीच्या व बेताबाताच्या होतात. तुका- राम, नामदेव, रामदास इत्यादि साधुकवींची वाणी, केवळ निस्टहता व जनोपहासाविषयीं निर्भयता या यो- गानेंच अकृत्रिम झाली आहे. मोरोपंत, मुक्तेश्वर, रघु- नाथ पंडित यांचें तसें नाहीं. यांच्या काव्यांत ठाकठिकी व बातवेत साधलेला आहे. यामुळे त्यांच्या कविते-