पान:वामनपंडित १८८४.pdf/७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

न केलेले दिसत नाहीं. केवळ ईश्वरगुण, सगुणनिर्गुणाचें ऐक्य आणि भक्तीचे महत्व हीं जगास दाखवावीं हाच त्याचा प्रधान हेतु होता. यामुळे त्याच्या बहुतेक प्रकर णांत भक्ति आणि शांत हे रस उत्कर्षानें वर्तत आहेत. वामनानें मराठीभाषेंत संस्कृतांतील अक्षरगणांच्या वृत्ताप्रमाणें वृत्ते उतरण्याचा प्रथमच आह्मावर अनुग्र- ह केला. ही गोष्ट वामनाचे यमकांकडे विशेष लक्ष्य लागण्यास कांहीं कारण झाली असावी असें वाटतें. संस्कृत रचना स्वभावतः माधुर्य ओजादिगुणांनीं अति मोहक आहे, यामुळें तींतील पद्यांशी मराठी भाषेतील पद्यांची तुलना जेव्हां वामनानें करून पाहिली असेल तेव्हां मराठी भाषेतील पद्य फिर्के आहे असें पंडितास वाटून, श्रुतिमाधुर्यादि चमत्कृतीकरितां त्यांनीं त्यांत प्रासयमकांची योजना केली असावी, व यमकास दुसरें- ही एक कारण असे असावें कीं, मुकुंदराज, ज्ञानेश्वर- आदिकरून महाराष्ट्रकवींनीं ओव्या, अभंग वगैरे छं- दांत सर्वत्र पद्यांच्या चरणांचीं सारखीं अक्षरें योजिले लीं आढळतात. तें अवलोकन करून अक्षरगणाच्या कठिण वृत्तास ही वामनानें यमकें मोठ्या परिश्रमानें व व्यापकपणानें योजिली आहेत. अनुप्रास यमकादि श- ब्दालंकाराविषयीं मराठीभाषेंत मोरोपंतानें तर सीमाच करून टाकिली आहे; तरी त्याला देखील वामनाचीं 'यमके पाहून मोठा आनंद व विस्मय झाला होता. ‘‘अन्यत्र नसे कवनीं यावे रस सर्व हा नियम कांहीं । “केली भाषाकवि जे त्यांची तो गर्व हा नियम कांहीं॥ मोरोपंत. वी. पं. स्तु.,