पान:वामनपंडित १८८४.pdf/७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(६८) वामनाच्या काव्यांत बहुतकरून सर्वत्र माधुर्य आणि प्रसाद हे गुण दृष्टीस पडतात. ओजोगुणाचें व्यंजकप- द्य बहुधा त्याच्या काव्यांत आढळत नाही. स्वभावोक्ति ह्या बहारदार व मनोरम अलंकाराचा वामनानें पुष्कळ ठिकाणीं उपयोग केला आहे. त्याची उदाहरणें अन्यत्र कांहीं आलींच आहेत यास्तव एथें आणखी देत नाहीं. अलंकाराचें साम्य चित्राशीं करितां येईल. इच्छेस वाटेल त्याप्रमाणें मनोहरत्वाची कल्पना करून तदनुरूप काढि- लेल्या चित्रापेक्षां ईश्वरनिर्मित मूर्तिविशेषाप्रमाणें हुबेहु ब काढिलेले चित्र किती मनोहर व बहारीचें दिसतें ! ही गोष्ट जुन्या चिताऱ्यांनीं काढिलेली चित्रे आणि फोटो- ग्राफांतील चित्रे ह्यांची तुलना करून पाहिलीं ह्मणजे ढळढळीत दिसूं लागते. स्वभावोक्ति हा अलंकार फोटो- ग्राफांतील तसबीरीप्रमाणें विवक्षितव्यापाराचें हुबेहुब चित्र होय. वामन संस्कृतज्ञ महान् पंडित होता यामुळे त्यास स्वाभाविक संस्कृताची फार संवय लागली असा- वी व त्याच्या व्यवहारांतील भाषणांत देखील संस्कृत शब्दाची अतिप्रवृत्ति असावी असे वाटतें; परंतु त्याच्या कवितेंत तसें दिसत नाहीं. अप्रसिद्ध संस्कृत शब्द किंवा चार चार पांच पांच पदांचे लांब लांब समास त्याच्या काव्यांत बहुतकरून आढळत नाहीत. त्याच्या काव्य- 1 रचनेची शैली साधी, सरळ व सुबोध आहे. त्यानें निव- डून वर्णन केलेली लहान लहान प्रकरणें कितीएक स्वभावतःच मनोरंजक आहेत व त्यांतील वर्णनही किती- एक स्थळीं बहारदार झाले आहे. काव्याच्या रीतीनें ए- कादें वर्णन करावें असा पंडितानें मुख्य हेतु धरून वर्ण-