पान:वामनपंडित १८८४.pdf/७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ६७ ) तो श्रांत झालों मग क्षुत्पिपासीं । वनामधें त्या पडलों उपाशीं ॥ तुं भक्षिसी चोरुनियां शिदोरी । शिक वृथा दाविसि दीर्घ दोरी ॥ ७३ ॥ जलद गर्जत ये जंव अंबरीं । झळकते अणि वीज न ते वरी ॥ सुभय ते स्थळिं वाटतसे मनीं । फिरुनि येत असों जंव नेमुनी ॥ ७४ ॥ कडकडुनि तयीं तो वर्षला मेघ भारी । तनुवरि मग जो कां रोमराजी उभारी ॥ अशनवसनहीनें आननें म्लान दीनें । करुनि जंव बसों तों वेष्टिलें त्या नदीनें ॥ ७५ ॥ पहा रवीचा मग अस्त जाला । घडे तयीं व्याकुळता द्विजाला || कांहीं तरी ठाऊक कीं सुजाणा । पुसे सुदाम्याप्रति देव जाणा ॥ ७६ ॥ केला कोप सतीवरी तदुपरी धांऊनि ये लौकरी । पायीं नम्र मिरीं खडे क्षितिवरी प्रेमा अह्मां किंकरीं ॥ हाका मारूनि अंबरी मुख भरी रेरे सुदाम्या हरी । तो आह्मां वदनावरी मिठि पडे शीतें अहाहा करी ७७ मौनें सन्मुख जातसों श्रमतसों कंपीत कीं होतसों । ओझें मस्तकिं घेतसों हळुहळू पाऊल टाकीतसों || विप्राला न दिसों उठों अणि बसों हुंकारही देतसों । पश्चात् भेटतसों पुसे तंव हंसों संतोष मानीतसों ॥७८॥ सुदामचरित्र.