पान:वामनपंडित १८८४.pdf/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

र्णन केवळ अंगत्वेंकरून ह्मणजे सद्गुण व भगवन्निष्ठा हे गुण चांगले प्रकाशित होण्यास पुष्टिकारक तितकेंच वर्णावयाचें होतें. असें असतां पंडितांनीं वरील चरित्रास आरंभ केल्यापासून त्यांतील बहुतेक भाग, सुदाम्याचें झोंपडें, वस्त्रें, पात्रें, धान्य, शरीर, दारिद्र्य इत्यादि व र्णनांत घालविला असून बाकीचा कांहीं भाग वरील सा- धु सद्गुणी दंपत्याच्या स्वभावाविरुद्ध व अप्रयोजक भा पणांत आणि वर्णनांत खर्च केला आहे. ह्या गोष्टीचे वरच्या चरित्रांतील मासले पंतपंडितांच्या तुलनाप्रकर- णांत पुढे दाखविण्यांत येतील. आतां या चरित्रांत कांहीं गुण नाहीं असेंही नाहीं. स्वभावोक्ति व अलंकार आणि माधुर्यगुण या योगानें वा- मनाच्या इतर कवितांप्रमाणे यांतील कविताही कोठें कोठें मनोहर झाली आहे. श्रीकृष्ण आणि सुदामा यांची भेट झाल्यावर, बाळपणी गुरुगृहवास व गुरुसेवा कसकशा प्रकारें घडली, याविषयीचे श्रीकृष्णाचें भा- षण चांगले साधले आहे. तें असें:- - एकेदिनीं श्रीगुरुचे सतीनें । सांगीतले कार्य अह्मास तीनें ॥ माते करूं वो ह्मणवोनि वाचे । बोलोनि गेलों शिशु मानवाचे ॥७० । त्यानंतरें जात असों वनाला । शंका नवाटे पहतां मनाला ॥ भारे बहू बांधुनि इंधनाचे । घेतां शिरीं मोर समोर नाचे ॥ ७२ ॥