पान:वामनपंडित १८८४.pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ग्रह होईल इत्यादि विचार स्वाभाविकपणें व्यवहारा- च्या कमसमजुतीमुळे वामनाच्या मनांत आले नसतील. त्यांतही पहिलाच प्रसंग; तेव्हां साधुचरितांत कांहीं तरी गमतीसारखें वर्णन केलें ह्मणजे पुण्य लागेलच असें वामनांनीं मानिलें असावें, असे वाटतें. आतां मनाच्या वृत्ति लीन होऊन त्यांस अंतर्मुखता प्राप्त झाल्यानंतर, उपहासादि मनोविकार उत्पन्न होण्यास जागाच राहिली नाहीं, असा तर्क केला तर, वामनास उपरति झाल्यानं- तरच त्यानें सर्व मराठी काव्य लिहिले आहे. तेव्हां त्यांतीलच सुदामचरित्र असतां त्यांत उपहास कसा आला अशी शंका येते. तिचें समाधान इतकेंच करून घेतलें पाहिजे कीं, उपरति झाल्याबरोबर लागलीच म नाची उन्मनीअवस्था होते असा अर्थ नाहीं. प्रथम अ- नुताप झाल्यानंतर अभ्यासानें होतां होतां मन स्वाधीन होऊं लागतें. त्याप्रमाणें वामनास उपरति झाल्याबरोबर प्रथमच सुदामचरित्र रचावयाचें त्याच्या मनांत येऊन त्या वेळी ही रचना केली, यामुळे त्या प्रकरणांत वर लिहिल्याप्रमाणें अनेक दोष राहिले आहेत असे अनुमान होतें. सुदामा ब्राह्मण अतिशय दरिद्री होता तरी तो प राकाष्ठेचा भगवन्निष्ठ होता. " शमोदमस्तपःशौचं क्षांति- रार्जवमेव च । ज्ञानं विज्ञानमास्तिक्यं ब्रह्मकर्म स्वभावज म्" हे ब्राह्मणाचे स्वाभाविक गुण सुदाम्यांत जागृत होते. त्याची स्त्री ही महा साध्वी, सुशीला होती. अशा दंप- त्याचें चरित्र वर्णन केले असतां मुख्यत्वेंकरून सद्गुण व भगवन्निष्ठा ह्या दोनच गोष्टी उज्वळ करून दाखविल्या पाहिजेत. याशिवाय शरीर, स्थान, दारिद्र्य इत्यादि व