पान:वामनपंडित १८८४.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २ ) *. कल्पना उत्पन्न होणें हा मनुष्यस्वभाव सर्व काळी व सर्व देशी दिसून येतो. यामुळे सर्व भाषांत आनंद व विश्रांति होण्याच्या हेतूनें कविता केलेल्या आढळतात. संस्कृतादि प्रगल्भ, प्राचीन आणि पूर्णत्वास पोहोंचलेल्या भाषांतून तर काव्याची रेलचेल होऊन गेली आहे. क विता हा केवळ मनोरंजनाचाच विषय आहे असें नाहीं, कवितेपासून अनेक लाभ आहेत. काव्यं यशसेऽर्थकृते व्यवहारविदे शिवेतरक्षतये । सद्यः परनिर्वृतये कान्तासंमिततयोपदेशयुजे || काव्यप्रकाश. या कारणास्तव काव्यावर मोठमोठाले शास्त्रग्रंथ व नले व सहस्त्रावधि विद्वानांचीं आयुष्यें कविता रचण्यांत आणि तत्संबंधी शास्त्रे बनविण्यांत खर्च झालीं आहेत. सरासरी ७०० वर्षांपूर्वी महाराष्ट्रभाषेंत कोणी क १ मुकुंदराज यास मराठी भाषेचा आद्य कवि मानितात. तो सरासरी बाराशे वर्षांपूर्वी झाला असे म्हणतात, परंतु यास कांहीं आ- धार नाहीं; म्हणून जुन्या नवनीताच्या आरंभी जो कवींविषयीं निबंध आहे त्यांत म्हटले आहे, व भरतखंडाचा अर्वाचीन कोश या नां- वाच्या पुस्तकांत, मुकुंदराजास होऊन ६६८ वर्षे झाली असे म्हटलें आहे. या दोहोंतून कोशांतील लेख अधिक प्रमाणभूत आहे असे दिसतें. तथापि उपलब्ध महाराष्ट्र, कवींत मुकुंदराज हाच जुनाट आहे याविषयीं कांहीं विवाद नाहीं. यास्तव सांप्रत उपलब्ध अस- लेली माहितीच प्रमाणभूत मानून चालले पाहिजे. मुकुंदराजाच्या ग्रंथाची भाषा चांगली शुद्ध व पौढ मराठी आहे. यावरून तो होता त्या काळी विद्वान् लोक या भाषेचा पुष्कळ उपयोग करित होते, व त्या योगानेंच ती इतकी सुधारली होती हैं खास अनुमान आहे. ते- व्हां मुकुंदराजापूर्वीही अनेक विद्वानांनी व कवींनी महाराष्ट्रभाषेंत