पान:वामनपंडित १८८४.pdf/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ६४ ) ण्याजोग्या आहेत; परंतु विस्तारभयास्तव एथें थोडाच उतारा घेतला आहे. तथापि त्यावरूनही गुणालंकार- चारुत्वानें सोज्वळ झालेले त्यांचें सौंदर्य स्पष्ट व्हावयाचें राहत नाहीं. वामनाच्या शृंगाराप्रमाणेंच वीर, करुणादिरसांतही कोठें तिलतंदुलन्यायानें, व कोठें कोठें नीरक्षीरन्या- यानें, शांत आणि भक्ति ह्या रसांचें मिश्रण झालेले आ- ढळतें, वामनानें प्रत्येक वर्णनप्रसंगी भक्तीच्या योगानें शुद्धभूमिका करून नंतर तिजवर शृंगारवीरादिरसांनीं मनोविकार चित्रित केले आहेत असे दिसतें. रासक्रीडा, भीष्मयुद्ध, भरतभाव, सीतास्वयंवर, द्वारकाविजय, बा- लक्रीडा इत्यादि प्रकरणें अवलोकन केली असतां वरील गोष्टींची प्रतीति येईल. पंडितांनीं तच्वविचाराचीं, भगवन्निष्ठेचीं व भगवद्भक्तां- चींही अनेक प्रकरणें काव्यात्मक लिहिली आहेत. त्या सर्वांत काव्यदृष्टीनें, प्रेमदृष्टीनें व व्यवहारदृष्टीनें ही सुदामचरित्राइतकें दोषपूरित, भक्तोपहासपर व ग्राम्य असें दुसरें कोणतेंही पंडितांनीं रचिलेलें प्रकरण नाहीं असें दिसतें. पंडितांचें हें सुदामचरित्र वाचिलें असतां असें वाटू लागतें कीं, ज्या समयीं पंडितांस कांहीं उपरति झाली आणि त्यांनी मराठीभाषेंत कविता लिहिण्यास आरंभ केला, त्या वेळीं प्रथमतःच जें प्रकरण हाती ध रिलें तेंच हें असेल. साधुचरित कोणत्या बुद्धीनें व री- तीनें वर्णन करावें; आपल्या वर्णनापासून लोकांचा काय १ पुढे सुदामचरित्राचा उतारा देऊन ह्या गोष्टी दाखविण्यांत आल्या आहेत.