पान:वामनपंडित १८८४.pdf/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ६३ ) स्वपवनें निज-बिंब-फळाघरा | करुनि शुष्क पदें उकरी धरा ॥ २८ ॥ कुच सुकुंकुम चर्चित चांगले । नयनबिंदु पडों वरि लागले ॥ गिरियुगीं अतसी कळिका जळें । स्तनतटीं तसिं वाहति काजळें ॥ २९ ॥ दाटूनि कंठ पडली वदनास मुद्रा | शोकें भरे जग जसें भरितें समुद्रा || घेऊनि चामर चुडासह मुद्रिकांहीं । भूई पडे उरि नुरे तनुमाजि कांहीं ॥ ३२ ॥ पडे केळ जैसी महा-चंड-वातें । असें देखतां ये कृपा माधवातें ॥ (उडी शीघ्र टाकी पलंगावरूनी । घरी उत्तरीयांबरा सांवरूनी ॥ ३३ ॥ उचलिलि चहुंहस्ती श्रीस्वयें श्रीधरानें । पुसि नयनजळातें त्यांत एक्या करानें ॥ कुचयुगुलिं हरीचे गुंतले दोन्हि पाणी । सदृढ़ घरि चतुर्थे पोटसी चक्रपाणी ॥ ३४ ॥ नयनशर धनुभवयांच्या प्रतापें । श्रवणवरिहि येती तांबडे कोप तापें ॥ अधर थरथरीती रक्तवर्ण-स्वभावें । असिस तुज पहावें बोलिलों याच भावें ॥ ११ ॥ रुक्मिणीविलासांतही पुष्कळ कविता उतरून घे-