पान:वामनपंडित १८८४.pdf/६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ६२ ) चहुकडूनि हि आनन शोभलें । पदक खालुनि शोभतसे भलें ॥ श्रवर्णिचे नग शोअति दोंकडे । वरुनि चांचर-केश-हि वांकुडे ॥ १२ ॥ रुक्मिणीस खिजविण्याकरितां श्रीकृष्ण तिला ह्मणतो- वरावे ते राजे निजसम तुवां राजतनये । नये आझा ऐसा क्वचिदपि वरूं वो सुविनये || दिल्हें बातें भावें त्यजुनि बरवे ते क्षितिपति । पती केला ज्याचे कुळपति समुद्रांत लपती ॥१५॥ ऐश्वर्यवंत आकृति समान स्वार्थार्थ होतिल परस्पर त्यास मान || मैत्री विवाह न घडे अधमोत्तमातें । तूं भाळलीस नृपनंदिनी काय मार्ते ॥ २० ॥ आतां तन्हीं क्षत्रिय तूं भलागे । वरीं जयाचा तुज लोभ लागे ॥ जेणें तुला साधिति लोक दोनीं । आह्मी वृथा काय बहू वदोनी ॥ २३ ॥ इत्यादि श्रीकृष्णाचें भाषण श्रवण केल्याबरोबर रुक्मिणीची जी अवस्था झाली तिचें वर्णनः- ' झाली असे परिसतांच अनाथ वाणी । “ ठावी नसे जिस कधीं असि नाथवाणी ॥ ” शुक ह्मणे स्त्रवली नयनांबुजीं । धुकधुकी मनि कंप हृदंबुजीं ॥