पान:वामनपंडित १८८४.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

RY 200/ च्या एकंदर काव्यासच शोभा आली आहे असे आ- झास वाटतें. स्वभावोक्तीवर पंडिताची फार प्रीति होती, व तिची भट्टी उतरण्याची हतोटीही त्यास चांगली साधली होती. भामाविलासांत उत्तम शृंगार आणि रुक्मिणीविला- सांत, तिच्या भाषणांत विषयविडंवन आणि ब्रह्मज्ञान कथन असें कां ? तर याचें कारण असे वाटतें कीं, स- त्यभामा ही भगवान् श्रीकृष्णास पुरुषविशेष मानून सेवन करीत होती, यामुळे विषयविलास व तत्संबंधी चेष्टा मात्र पंडितांनी तिच्या स्वभावांत दाखविल्या आहेत. रुक्मिणीचें तसें नाहीं. ती आदिमाया, भगवान् श्री- कृष्ण ह्यास पूर्णब्रह्म सनातन मानून भजत होती, या- मुळे विलासांतही तिच्या भाषणांत विषयादि तुच्छ मा- निलेले दाखविले आहेत. रुक्मिणीविलासांत रुक्मिणीच्या भाषणांत विषय- विडंबनादि विस्तारानें वर्णन केले आहे, तरी आरंभास शृंगाराचा व स्वभावोक्तीचा मासला उत्तमच आहे. करमुद्या वलयांसह चाळितां । चवर माधवजीवरि ढाळितां ॥ ध्वनि उठे चरणीं मृदु भूषणीं J हृदय लग्न जिचे यदुभूषण ॥ ९ ॥ हरिवरि चवरेसी जेधवां हस्त नाचे । दिसति वस्त्री कंप काही स्तनांचे ॥ चळति कुचयुगाच्या कुंकु में रत्नहार । स्फुरतिच पदराही

त्यांचे बिहार या १० & KASHINATH वाचना ATHE.