पान:वामनपंडित १८८४.pdf/६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

1 ( ६० ) व त्यांतही स खुलत वंधानें मत्सर व क्रोध किती व कसा असतो, हें ढळ- •ढळीत, रेखल्याप्रमाणे दाखविलें आहे. त्यभामेच्या संबंधानें ही गोष्ट फारच चांगली आहे. भगवान् श्रीकृष्णाच्या सहस्त्रावधि स्त्रियांमध्ये सत्यभामेसारखी मानिनी दुसरी कोणीही नव्हती. ह्या गोष्टीची प्रसिद्धि लोकांत एथपर्यंत आहे कीं, एकाद्या मानी दाष्ट मुलीनें हट्ट केला तर त्या वेळी तिला काय भामा आहे !! असे ह्मणण्याची चाल पडली आहे. सत्यभामेच्या स्वभावांत मत्सर आणि क्रोध वर्णिल्यानें वामनाच्या ह्या काव्यास अतिशय शोभा आली आहे. आपला प्रिय हृदयंगमपति सवतीवर आपणापेक्षां अ- धिक प्रीति करितो व तिची मनधरणी करितो, हें भा- मेच्या क्रोधाचें कारण असून, भामाविलासांतील कथेस एथूनच आरंभ झाला आहे, यामुळे आरंभापासून यांत शृंगार भरलेला आहे. काव्यदृष्टीनें व ग्रंथसंबंधानेही पहातां भामाविलास फारच चांगला साधला आहे. हा सर्वच एथें उतरून घेण्याजोगा मनोरम आहे; परंतु स्थलसंकोचामुळे त्याचा बराच भाग सोडून द्यावा ला गला. भामाविलासांत श्रीकृष्णाचें खुत्रीदार व मनोहर भाषण आणि कोपातिशयामुळे त्यावर भामेचें थोडें ला- डाचें, रुसाव्याचें, क्रोधमिश्रित भाषण आणि हावभाव हीं इतकी उत्तम साधलीं आहेत कीं, भामाविलासभु- वनांत प्रत्यक्ष ही गोष्ट आपण पहात आहों की काय ? असा भास होतो. भामाविलासांत माधुर्य, प्रसाद, स्व- भावोक्ति, अनुप्रास, यमकें इत्यादि गुणालंकार ही इतके चांगले साधले आहेत की, त्यायोगें महाराष्ट्रभाषे-