पान:वामनपंडित १८८४.pdf/६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ५९ ) धरावें या अंकी शिर अजि तिचें पक्षिगमना । मना आलें देणें कुसुम जिस ते कंसदमना ॥ २४ ॥ तों नेत्र मोडुनि वदे ढकलूनि मांडी । भ्रूमंडळीं भ्रमण अंगुलि भंग मांडी ॥ तो कृष्णजी करुनि हास्य ह्मणे अहाहा । वेडे अनर्थ इतुक्यास्तव कां महा हा ॥ २५ ॥ हरी जाणें हें कीं न वदत असे क्रोधनिकरें । करें आलिंगावी प्रिय वदत हे म्यां प्रियकरें ॥ करें श्रीचंद्राच्या कठिन शशिकांत द्रवतसे । तसे हेही भाव प्रकट करणारी अमृतसे ॥ ३२ ॥ करूनी अशा सत्य नेमास तीतें । 'बळे ओढुनी सत्यभामा सतीतें । दिलें क्षेम त्या दुर्लभा-माधवानें । चहूंही भुजीं सत्यभामा-धवानें ॥ ३३ ॥ असी ते बुझावूनि रंभोरु हातें । तिच्या धूतसे हो मुखांभोरुहातें || उटी लावुनी वाटल्या केशरा जी । स्वहस्तांबुजी विंचरी केशराजी ॥ ३४ ॥ करि हरि यमुनाहो मूदगंगावनाची । मिरवि धवलपुष्पीं दीप्ति गंगावनाची || सित असित नद्यांच्या संगमीं श्रीत्रिवेणी | तसिच यदुपतीनें घातली चित्रवेणी || ३७ ॥ वर दिलेल्या उताऱ्यांत स्त्रीजातीचा, सवतीच्या सं-