पान:वामनपंडित १८८४.pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ५८ ) अलक हार गळांतिल तोडिते । कुरळ केश मुखावरि सोडिते ॥ करयुगें उरमस्तक ताडिते । वसन आणिक कंचुकि फाड़िते ॥ ९ ॥ महाउष्णश्वासें करुनि वदते शुष्क अधरा । घराष्टष्ठीं जोडा न राठ दुसरा या गिरिधरा || धराया माझा हा कर कपटि कैंचा जनमला । मला जो निंदूनी कुसुम तिस देऊनि रमला ॥ १ ॥ सख्याहो मेल्याही शवहि न शिवो हें यदुपती । पती नानास्त्रींचा पतितजनही ज्यास जपती ॥ नका येऊं देऊं सदनि सवतीच्या प्रियकरा । करातें लावीना मज कपटि ऐसे तुझि करा ॥ ॥११॥ सर्वज्ञ तीची समजोनि टेवी । मौनेंचि नाकावरि बोट ठेवी ॥ काढी उशी घालुनियां स्वमांडी । त्यानंतरें सांत्वन यत्न मांडी ॥ १५ ॥ ह्मणे शोक कां प्राप्त झाला महा हा । असी कष्टली कां शुभांगी अहाहा || न बोलेचि कां आजे आह्मांशि राणी । जिच्या बोलण्याचीच आह्मा शिराणी १७॥ वदे भामा कोपें अति-विकळ चाऊनि अधरा । घराष्टष्ठीं नाहीं ठक तुज असा अंबुजघरा ॥