पान:वामनपंडित १८८४.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ५७ ) शृंगाररसाचें सरोवर कोरडें ठ- विषय विडंबन होऊन णठणीत दिसूं लागतें !! काव्यदृष्टीने पाहिले तर रुक्मिणीविलासांतील क विता पंडिताच्या नेहमीच्या कवितेप्रमाणे चांगली सा- घली आहे यांत कांही संशय नाहीं; परंतु ग्रंथसंबंधानें पहातां विलासांत विषयविडंवन व आत्मज्ञानकथन किती विरुद्ध आहे हे सांगावयासच नको. आतां विलासांत कोणत्या गोष्टी असाव्या हें पंडि- तास समजत नव्हतें असें ह्मणावयास जागा नाहीं का- रण त्यानेंच “ भामाविलास " ह्मणून एक लहानसें प्र- करण गाइलें आहे. त्यांत शृंगार फार खुबीदार व मा- र्मिक रीतीनें वर्णिला आहे. त्याचा कांहीं मासला पहा:- कृष्णासि कृष्ण-पद-भक्ति विशारदानें । जें स्वर्गपुष्प दिधलें मुनिनारदानें ॥ तें रुक्मिणीप्रति दिलें त्रिजगन्निवासें । जें द्वारका करि भरोनि सुगंधवांसें ॥ ६ ॥ असी गोष्टी दासी-जनीं बायकांनीं । विचारूनियां सांगतां जाय कानीं ॥ तई सत्यभामा महाक्रोध दावी । बुझावी हरी तेचि लीला वदावी ॥ ७ ॥ गडबडा धरणीवरि लोळ ते । वदवती न कवीसहि लोळते ॥ रडत मूर्च्छित होय घडीघडी । पवन निश्रळ नेत्र न ऊघडी ॥ ८ ॥