पान:वामनपंडित १८८४.pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्मश्रु रोम नख केश कातडी । आंत मांस कफ पित्त आंतडीं || मूत्र शेंबुड मळादि वाहती । त्यासि सुंदरपणेंचि पाहती ॥ ११७ ॥ मृगजळ पुरुषाचा देह नाना- विकारी | रविकर-सम त्यांत श्रीपती निर्विकारी कुलवधु जरि पातिव्रत्यमार्गेचि पाहे । भवजलधि तरे ते सर्व तूझी कृपा हे ॥ ११८ ॥ आणखी पहा:- - ह्मणउनी ह्मणते अजि केशवा । गणिति आत्मपर्णे जितके शवा ॥ अबुध इच्छुनि भाग्य नृपासना | करिति माझिच काम्य उपासना ॥ ५० ॥ तनुस मी ह्मणुनी अभिमानिती । विषय-दुःखहि जे सुख मानिती ॥ धरुनि ते दृढ दुर्भर-वासना | करिति यज्ञ असे मदुपासना ॥ ५३ ॥ न अभिमानिति या तितके शवा । भजति केवळ ते तुज केशवा ॥ मृगजळासम भाग्य नृपासना | गणिति ज्यांस चिदर्क-उपासना ॥ १४ ॥ याप्रमाणे रुक्मिणीविलासांत रुक्मिणीच्या भाषणांत सर्वत्र वामनानें आत्मज्ञान ओतले आहे. यामुळे अर्थात्