पान:वामनपंडित १८८४.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ५५ ) • गोशब्दें जडबुद्धि इंद्रिय तयां जे पाळिती गोप ते । हे गोपाळ ह्मणूनि हे श्रुति तयां संबोधुनी बोलते ॥ कीं हें आक्रमिलें पढ़ें करुनियां त्रैलोक्य या कारणें । त्याचे धर्म धरूनि कर्महि पहा कर्मासि जें पारणें ॥३२॥ कर्माणि पश्यत ह्मणे श्रुति विष्णुक । पाहा मनीं श्रवण - कीर्तन-रूप धर्मे ॥ संध्या जशी श्रुति वदे विधि एथही हा । कर्माणि पश्यत ह्मणे हरिकर्म पाहा ॥ ३३ ॥ इत्यादि-नामसुधा. अध्या० ३ च० ३ याशिवाय कर्मतत्त्व, यथार्थदीपिका, समश्लोक ह्मस्तुति इत्यादि अनेक ग्रंथांत अनेक स्थलों वामनानें श्रु- तिप्रमाणानें फार चांगला तत्वविचार केला आहे. त्यां- तील कांहीं मासला उतरून घेण्यास स्थलावकाश नाहीं. वामनाची अद्वैतशास्त्रावर इतकी अभिरुचि होती की, शृंगारादि रसास उद्दीपन करण्याजोगी उत्तम सामग्री, असतांही ती एकीकडे ठेवून तेथेंही यथेच्छ आत्मज्ञान कथन करण्यास त्यानें मार्गे पुढे पाहिलें नाहीं. रुक्मिणी- विलास, या प्रकरणांत शृंगाररस प्रधानत्वेंकरून अ- सावयाचा, परंतु त्यांत खालीं लिहिल्याप्रमाणें अनेक पद्ये आहेत. स्त्रियांचे ते देवा नृपति खर कीं बैल कुतरे । अहा कोणी बोले वधिति धनराज्यार्थ सुत रे ॥ नवोढांच्या लाता खर-पुरुष सोसूनि रमती । वृष स्कंधीं घेती श्वनर अवमानाई कुमती ॥ ११४ ॥