पान:वामनपंडित १८८४.pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जेबाचा उउग श्रीः वामनपंडित. K. G. MARATHE. 7733/0000 वाटे सूक्तिश्रवणें मस्तक वाल्मीकिनेंहि डोलविला | प्रभुनें भुलवाया मन वामन हा वेणुसाचि बोलविला ॥ मोरोपंत. या अखंडदंडायमानकालांत अविनाश व विमल यश संपादन करण्याकरितां, सहस्रावधि कविजनांनीं अप- रिमित परिश्रमानें बुद्धिवैभवाचा अतोनात व्यय करून, ग्रंथमिषानें आपल्या चिरस्थायी मानसमूर्तीच जगांत ठेविल्या आहेत. संसारांतील नानाप्रकारच्या त्रासांनीं चित्त उदास झालें असतां त्यास महाकवींच्या वचना- मृतपानासारखी आनंदजनक विश्रांति दुसरी कोणती आहे ! रसिक कवीचें काव्य वाचीत असतां आपण न- व्याच आनंदसृष्टीत आहों असें वाटू लागतें. ह्या कविसृष्टीचें वर्णन काव्यप्रकाशांत केलें आहे तें असें :-- नियतिकृतनियमरहिताल्हादैकमयीमनन्यपरतन्त्राम् । नवरसरुचिरां निर्मितिमादधती भारती कवेर्जयति ॥ १ ॥ ह्या दृष्टसृष्टीशीं काव्यसृष्टीची तुलना करून, काव्य- सृष्टीचा उत्कर्ष वरील पद्यांत किती मनोहर रीतीनें व- र्णन केला आहे सृष्टिसौंदर्य, आकाश, नक्षत्रें, सूर्य, चंद्र, समुद्र, प- र्वत, मानसव्यापार ह्यांच्या अवलोकनानें चमत्कारिक