पान:वामनपंडित १८८४.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ५४ ) •याकारणें मुक्तिसि नाश नाहीं ॥ न नित्यता कर्मफळासि कांहीं ॥ सांडूनियां मोक्ष अशा फळाला || बोलेल कां वेद जनास बोला ॥ २५ ॥ स्वर्गकाम-सुतकामजनाला ॥ यज्ञ कां वदतसे श्रुति बाला || पूर्वपक्ष करिताति असाही ॥ वेदतत्त्व तरि ठाउक नाहीं ॥ २६ ॥ नयनिं दाउनि लड्डुक शर्करा | जननि दे कडुऔषध लेकरा ॥ न फळ साखर औषधिचें जसें । श्रुति वदे फळकाम्य जगीं असें ॥ २७ ॥ 'स्वर्गाचीही कामना ज्या नराला | ज्योतिष्टोमा तो यजूकां सुराला || ऐसा अर्थ स्पष्ट पाहा श्रुतींत । ज्योतिष्टोमस्वर्गकामोयजेत ॥ २९ ॥ श्रवण-कीर्तनही वदती श्रुती । परि न तुच्छ फल श्रुति बोलती ॥ ह्मणति वैष्णवधर्म धरा अरे । त्रिभुवनेश्वरकर्म पहा बरें ॥ ३० ॥ ऋग्वेदिंची त्रीणि पदा ह्मणूनी । हे गर्जताहे श्रुति विश्वकानीं ॥ की विष्णुचे धर्म धरूनि राहा । ऐकूनि तत्कर्म मनांत पाहा ॥ ३१ ॥