पान:वामनपंडित १८८४.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ५३ ) यज्ञादिकों करुनि होइल चित्तशुद्धी । ज्ञानें करूनि तदनंतर मोक्षसिद्धी || याकारणें निगम बोलति यज्ञदीक्षा | हे स्वर्गमात्रगमनीं धरिती अपेक्षा ॥ ८ ॥ स्वर्गादि काम करिती विविधा मखांसी । ते तों न पावति निजात्ममहासुखासी ॥ कोशिंबिरी करुनि भक्षिति पुष्पमात्रें । त्याला फळे मग न त्या तरुचीं विचित्रें ॥ ९ ॥ यज्ञादि-वृक्ष फळ-मोक्ष तयांसि येती । स्वर्गादिरूप - सुमनें जन तींच घेती ॥ सर्वज्ञ जे करिति त्या सुमनीं उपेक्षा । होऊनी तींच सुमनें फळ देत मोक्षा ॥ १० ॥ नानाकर्म करूनियां क्षितितळी राज्यादि संपादिती ॥ तैसा स्वर्गहि यज्ञ-पुण्य-विविधाकर्मीच की पावती ॥ जैशा या इहलोक राज्यपदव्या कर्मार्जिता नासती ॥ तैसीं तीं परलोकदैविकपदें बोले असें हें श्रुती ॥२२॥ आतां चातुर्मास्य-यज्ञादि-पुण्यें ॥ अक्षय्यें तीं केविं बोला अगण्यें || तेव्हां ऐसा अर्थ अक्षय्यशब्दें || कीं तीं पुण्ये राहती फार अब्दें ॥ २३ ॥ ह्मणूनि देवा अमरत्व जैसें ॥ नित्यत्व या कर्मफलासि तैसें ॥ कोण्ही श्रुतिज्ञान फळासि तैसा || न बोलती नाश तयांत ऐसा ॥ २४ ॥ .