पान:वामनपंडित १८८४.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ५२ ) नाममुर्धेत वामनानें अग्नीचा दृष्टांत घेऊन नामप्रभाव अनेकदा उत्कृष्ट करून दाखविला आहे. यावरून ना- मसंकीर्तनावर वामनाची फार भक्ति होती असे दिसतें. एकादा अभक्तिमान् दांभिक ग्रंथकार असता तर मुळी नाममाहात्म्य वर्णनाचा विषयच तो हातीं धरिताना; बरें कदाचित् हातीं धरिताच तर विषयप्रतिपादन करितेवेळी एकच दृष्टांत पांच पंचवीस वेळां घेतल्यानें श्रोत्यांस आपला ग्रंथ कंटाळवाणा होईल काय ? असा पदोपदी विचार करून त्यानें ग्रंथ लिहिला असता. आमचे पंडित महान् भक्तिमानु, निस्टह, सरल आणि आनंदी होते. या मुळे भक्ति, अद्वैत किंवा भक्ति आणि अद्वैत मिळून, व- र्णन करण्याचा प्रसंग आला असतां, एकच गोष्ट अनेक वेळां दृष्टांत घेऊन, सिद्ध करून ठेविल्याशिवाय त्यांचें पाऊलच पुढें पडत नव्हतें, असें वाटतें. वेदश्रुतीचा मार्मिक अर्थ प्राकृतजनांस समजावून द्यावा. असा कितीएक प्रकरणावरून पंडितांचा मुख्य हेतु दि- सतो. काम्यफलास प्रसवणारी यज्ञादिकमें आहेत या स्तव स्वर्गप्राप्त्यर्थ, पुत्रप्राप्त्यर्थ इत्यादि कामना धरून तीं करणें हें अल्पदृष्टीचें काम आहे. कारण, स्वर्गा- दिफलें आद्यंतवंत नश्वर अशीं असून, यज्ञादिकर्मे के- वळ चित्तशुद्धीकरितांच वेदाने सांगितली आहेत. तशी चित्तशुद्धि झाल्यानंतर ज्ञानेकरूनच मोक्षसिद्धि होते, इत्यादि तात्त्विकविचार, भक्ति, वैष्णवधर्म व आत्मज्ञान ह्यांचें अतिशय महत्त्व आहे, या गोष्टीशीं वेदार्थाचें सर्वत्र ऐक्य ठेवावें असा पंडिताच्या ग्रंथाचा कटाक्ष आहे.