पान:वामनपंडित १८८४.pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ५० ) या थाटानें वर्णन करून, काव्याचें सुंदर गवण्य लो- कांपुढे ठेवण्याचा हा प्रसंग वामनास फार चांगला होता; तथापि भगवद्गुणवर्णनावांचून काव्य करणें हें नीच काम आहे अशी जी वामनाची समजूत होती, तिला अनुसरून वरील प्रसंगाचा लहानसाच परंतु भक्ति आणि वात्सल्य यांनी भरलेला असा श्रीकृष्णरूपी पूर्ता, भाग वामनानें निवडून वर्णन केला आहे हें तें प्रका पाहतां उघड दिसतें. घ भगवद्भक्तांचें वर्णनही वामनानें केलें आहे; तथापि, त्यांत ही ईश्वराची भक्तवत्सलता दाखविण्याचाच प्रधा- न हेतु दिसतो. या गोष्टीचें "भीष्मयुद्ध" हें एक उदा- हरण आहे. पुष्कळ अद्वैतवादी पंडित, मूर्तिपूजा अथवा सगुणो- पासना मुळींच मानित नाहींत; परंतु वामनपंडित हा अद्वैतवादी असतांही मोक्ष सुलभ होण्याकरितां स- गुणभक्ति करणे फार अवश्य आहे असा त्यानें दृढ़- निश्चय केला होता. त्यानें आपल्या प्रत्येक ग्रंथांत आ | त्मज्ञान आणि भक्ति ह्यांची सांगड घालून त्याच पाया- वर आपल्या सर्व ग्रंथांची इमारत उभारिली आहे. भा- गवतांत ज्या सगुणभगवडीला वर्णन केल्या आहेत, त्यांतील प्रेमातिशयास प्रसवणारे प्रसंग पाहून त्यांवर अत्यंत भक्तिपुरःसर काव्यरचना वामनानें केली आहे. ह्याचा मासला कृष्णजन्म, बालक्रीडा, उखळबंधन, ह- रिविलास इत्यादि प्रकरणे आहेत. .. लौकिक विषयाचे वर्णन करितांना वामनानें कोठें विस्तार केला नाहीं. परंतु जेथें जेथें अद्वैत विवेचन कर