पान:वामनपंडित १८८४.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ४९ ) हें विश्व आणि कमळासन अंडकोटी । यांतील काय मज सांग तुझ्या न पोटीं ॥ ४० ॥ चरण २ वरच्या शेवटल्या श्लोकांतील उद्वार किती उदात्त व भेदक आहे !!! घेण्या- ब्रह्मस्तुति हा ग्रंथ माधुर्य आणि प्रसाद यांचें माहेर- र आहे. यांत वामनानें भक्तिरसपूरित वर्णन पुष्कळ ठिकाणीं केलें आहे. मासल्याकरितां उतरून जोगीं अनेक स्थळे आहेत तरी तसे करण्यास एथें स्थ- लावकाश नाहीं. या प्रकरणांतील किती एक उद्गार आ णि वर्णनें इतकी चांगली उतरली आहेत कीं, मराठी- भाषेतील उत्तमकाव्यांत तीं पहिल्यास्थानीं बसविण्यास योग्य आहेत. या ग्रंथांत आत्मविचाराचा कठिण विषय जरी वर्णिला आहे तरी सर्वत्र सोपी, गोड आणि बाळ- वोध भाषा घातली आहे. वामनानें भागवतरामायणादि ग्रंथांतून कांहीं कथा- भाग अशा चातुर्यानें व खुबीनें निवडून घेतले आहेत कीं, त्यांत बहुतकरून परमेश्वराचे अगाध, अद्भुत आणि निर्मलयश वर्णन करण्याचाच प्रसंग येईल. या गोष्टीचें "दंपत्यचरित्र" हें एक उदाहरण आहे. यांत वामनाची उपास्यदेवता भगवान् श्रीकृष्ण ह्याच्याच भक्तवात्सल्यादिनिर्मूलगुणांचें वर्णन करण्याचा त्याचा हेतु फार स्पष्ट होतो. कारण धर्मराजाच्या अश्वमेधांतील अश्वास स्नान घालण्याकरितां, धर्मराजाच्या आप्तसोय- ज्यांची शेंकडों दंपत्यें येऊन जो समारंभ झाला, तो मो- ५