पान:वामनपंडित १८८४.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ४८ ) टीका याकरितांचि हे त्रिचरणी लोकत्रयीं संचरे । येथें या चरणीं मुकुंदचरणीं सप्रेम जो तो तरे ॥१९१॥ चरण १. प्रथमचरण एथें वर्णिला भक्तियोगें ॥ तदुपरि दुसरा जो ज्ञानकांडप्रसंगें || पुनरपि चरणीं या भक्ति गोविंदजीची || कथिन सरि न पावे मुक्ति कैवल्य जीची ॥ १ ॥ चरण ३. या ग्रंथांतील कविता मधुर आणि भक्तिरसपूरित आहे. ब्रह्मांड सावरण सर्व शरीर माझें । होते असें चहुं शिरांवरि गर्व-ओझें ॥ ब्रह्मांड आणि चतुरानन कोटि-कोटी । दावोनि बुद्धि हरिली हरिनेंचि खोटी ॥ ३० ॥ अंडे किती विधि किती मज लेखवेना । तेव्हां अतर्क्स-महिमा मज देखवेना ॥ आच्छादिलें विभव हें हरिनोंच जेव्हां । . आली मला स्मृति हळू हळु आणि तेव्हां ||३२|| ह्मणुनि अंडशरीरहि मी जरी ! तरिहि मेरुपुढें जशि मोहरी ॥ मनि विचारुनियां विधि येरिती । वदतसे स्वलघुत्व हरिप्रती ॥ ३३ ॥ गर्भात अर्भक जरी जननीस लाता । हाणी तयास हरि काय करील माता