पान:वामनपंडित १८८४.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १७ ) अध्यायाच्या आरंभी कांहीं कांहीं अनुष्टुपछंदाची पधें पंडितांनी घातली आहेत. ही एक लहानशीच टीका पाहिली तरी गीतेचें सार समजण्यास कांहीं हरकत प डणार नाहीं इतकी चांगली ही टीका साधली आहे असें आह्मास वाटतें. ह्या टीकेंत सोपे शब्द, सरल अर्थ, सुसंगति आणि व्याकरणशुद्धिही आहे. हिज- विषयीं मोरोपंतानें झटलें आहे:- आर्या (गीति ) - रीति समश्लोकीची अतुला साधेल काय भव्यास | या सुयश होइल कां रोमांचव्याप्तकाय न व्यास |॥ ६॥ मोरोपंत. ब्रह्मस्तुति, ही भागवतांतील ब्रह्मदेवकृत स्तुतीची टीका आहे. ज्याणें दाउनियां अतर्क्यमहिमा ब्रह्मा मनीं मोहिला । तो आच्छादुनि नंद नंदनवनीं जो एकला राहिला ॥ तेव्हां सावध होउनी नमुनियां ब्रह्मा करी जे स्तुती । त्या ब्रह्मस्तुतिची करी हरिच तो टीका स्वयें श्रीपती २ वामन. श्रीमद्भागवतांतील दशमस्कंधांत ब्रह्मदेवानें जी स्तुति केली आहे, तिची श्रीपति वामनानें त्रिविक्रमपणें ही त्रिचरणी व्याख्या केली. पहिल्या चरणांत भक्तियोग, ! दुसऱ्यांत ज्ञानकांड आणि तिसऱ्यांत पुनः भक्ति, या प्रमाणें वर्णन केलें; ह्मणून वामनानें सांगितलें आहे. श्रीमद्भागवती विचित्र दशमस्कंधी विरंचिस्तुती तीची वामन हे त्रिविक्रमपणें व्याख्या करी श्रीपती ॥