पान:वामनपंडित १८८४.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकारें लागू होतो. यामुळे वामनानें भगवद्गीतेवरील प्राकृत टीकाकारांविषयीं जें जें लिहिले आहे तें तें मुख्यत्वेक रून ज्ञानेश्वरासच लक्षून लिहिले असावें असे आह्मांस वाटतें. या आमच्या ह्मणण्याचें दृढीकरण ज्ञानेश्वरीवरून- ही होतें. तींत "प्रत्यक्षावगमं धर्म्यं ससुखं कर्तुमव्ययम्”२ ह्या श्लोकाची टीका लिहितांना धर्म्यपदाची कांहींच व्याख्या केली नाहीं. एके ठिकाणी "तरी पवित्र आणि रम्य ॥ तेंविचि सुखोपायें गम्य || आणि स्वसुख परि- धर्म्य ॥ वरी आपणपा जोडे" ॥ ५५ ॥ इतकें मात्र ह्मटलें आहे. तेंवर दाखविलेल्या यथार्थदीपिकेंतील १५० व्या ओंवीस बरोबर मिळतें. तेव्हां यथार्थदीपिका- कारानें प्राकृत टीकाकाराविषयीं केलेला उपहास ज्ञाने- श्वराकडेच लागतो असें ह्मणण्यास कांहीं हरकत नाहीं. तथापि धर्म्यपदाची यथार्थ व्याख्या केली याविषयीं वा- मनपंडिताची स्तुतिच केली पाहिजे. · समश्लोकी, ही भगवद्गीतेवरील सुंदर चिमकुली टीका फारच चांगली सावली आहे. ह्या टीकेंत मुळां- तल्याप्रमाणें छंद, वृत्त, अर्थ, पद्यसंख्या हीं तसींच कायम ठेवून फक्त मराठी भाषांतर मात्र केलें आहे. व पूर्वापराभ्यायांतील मजकुराचा संदर्भ जोडण्याकरितां दीस घेऊन यावें. त्याप्रमाणें सच्चिदानंद बावा यानें ज्ञानेश्वरीची मत तयार करून नेली. शके १२ शें बारोत्तरें । तैं टीका केली ज्ञानेश्वरें ॥ सच्चिदानंद बाबा आदरें || लेखकू झाला || ज्ञानदेव.