पान:वामनपंडित १८८४.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ४५ ) अनेक टीकाकारांस लक्षून बोलल्यासारखाही भास होतो; तथापि ज्ञानेश्वरावांचून अन्य टीकाकारांची मु ळींच प्रसिद्धि नाहीं व सिद्धीच्या साधनानें टीकांची ज- गांत प्रसिद्धि केली हा आरोप ज्ञानेश्वरावर फार चांगल्या " १ ज्ञानेश्वरानें कित्येक प्रसंगी अनेक अलौकिक अद्भुत चमत्कार करून दाखविले अशा दंतकथा हजारों लोकांच्या मुखाने ऐकण्यांत येतात; इतकेंच नाही तर, भक्तविजयादि ग्रंथांतही ते चमत्कार इति- हासरूपानें लिहून ठेविलेले आढळतात. ज्ञानेश्वरीच्या संबंधाने अशी एक कथा ऐकिली आहे कीं, ज्ञानेश्वरानें पैठण येथें रेड्याचे मुखानें वेद बोलविल्यानंतर पैठणाहून निघून तो आपल्या भावंडांसह दुसरे एका गांवीं मुक्कामास गेला ( हें गांव नेवासें असावें ) आणि एका देवालयांत उतरला. तेथें त्यानें देवळांतील भिंतीवर एका रात्रोंत कोळशानें भगवद्गीतेचा अर्थ लिहून ठेविला तीच ज्ञानेश्वरी उजाड- ल्यावर एक मळवट भरलेली स्त्री निवृत्तिनाथाच्या दर्शनार्थ आली व तिनें त्याच्या पायांवर डोके ठेविलें; तेव्हां निवृत्तीनें • अष्टपुत्रा सौ- भाग्यवति भव' असा आशीर्वाद दिला. ती स्त्री आपल्या पतीचे श- वावरोबर सहगमनास चालली होती, यास्तव निवृत्तीचा असा आशी- र्वाद ऐकून तिला सखेदाश्चर्य झालें. आणि तसे उद्वार तिनें प्रकट करून आपली हकीकत सांगितली. निवृत्तीने तिच्या पतीचें नांव विचारतां सच्चिदानंद आहे असे तिनें सांगितलें. तेव्हां ज्ञानेश्वरास हाक मारून निवृत्तीनें विचारिलें कीं सच्चिदानंदास मरण आहे काय? ज्ञानेश्वर म्हणाले, नाहीं. निवृत्ति म्हणाले, मग ही बाई म्हणते सच्चि- दानंद मेला हे कसे ? ज्ञानेश्वरानें सांगितलें कीं, बाई अगदी खोटें बोलत आहे; प्रत्यय पहावयाचा असल्यास सच्चिदानंदास हांक मा. रतों. असें म्हणून ज्ञानेश्वरानें हांक मारल्याबरोवर सच्चिदानंद जिवंत होऊन पायीं चालत आला. व त्याने ज्ञानेश्वरादिकांस वंदन केलें. तेव्हां ज्ञानेश्वराने त्यास कामगिरी सांगितली की, ह्या देवळाच्या भिं-- तीवर मी ज्ञानेश्वरी लिहून ठेविली आहे, तिची प्रत करून ती आळं