पान:वामनपंडित १८८४.pdf/४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २ ) श्रीमंत महाराज तुकोजीराव होळकर सरकार ह्यांच्या नीतिमान् राजछायेखालीं, परमेश्वरकृपेनें आनंदांत काल- क्रमण होत असतां, पुणे येथील दक्षिणामैज् कमिटीच्या उदार उत्तेजनानें माझ्या हातून, तुकाराम, मोरोपंत, वा- मनपंडित, रामदास, एकनाथ आणि ज्ञानेश्वर या प्र त्येक साधुकवींवर एक याप्रमाणे सहा निबंध निर्माण झाले. यांपैकी तुकाराम व मोरोपंत यांजवरील निबंध यापूर्वी छापून प्रसिद्ध झाले असून, सांप्रत वामनपंडिता- वरील निबंध मुद्रणद्वारा लोकसमूहाच्या अनुग्रहार्थ सा- दर पुढे केला आहे. इंदुर तारीख ६ आगस्ट सन १८८४ इसवी. श्री. } ग्रंथकर्ता.