पान:वामनपंडित १८८४.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ४४ ) एक ज्ञानेश्वरीनांवाची मात्र विस्तृत टीका झालेली आहे- ती ज्ञानेश्वर नांवाच्या साधुपुरुषानें केली आहे. या खेरीज दुसरी टीका आमच्या पाहण्यांत व ऐकण्यांत नाही. वामनानें यथार्थदीपिका लिहितांना नवव्या अ- ध्यायांत असे झटले आहे की, - सर्व ज्ञानाचा कळस | मुक्ति देऊनिही ज्याच्या दानीं आळस ॥ त्याचा द्यावयाचा ओरस ॥ भक्ताच्या ठायीं येथे दाखविसी ॥ २३ ॥ रहस्य ऐसें उत्कट ॥ या अध्याय करिसी जरी प्रकट ॥ तरी अनन्य भक्ती. वांचूनि संकट ॥ पडिलें टीकाकारासही ॥ २४ ॥ वं- दिती पूजिती तुझे चरण ॥ तरी अंतरी इतर देवता श रण || करिती क्षुद्रदेवता मंगलाचरण || इच्छोनि नि- विघ्न कवितास्फूर्तीही ॥ २५ ॥ राजविद्या राज गुह्या- चा | उकल नव्हे त्यास साचा ॥ जसी तसी युक्तवा- चा ॥ योजोनि गेले ॥ २६ ॥ जगीं मिरवोनिया सिद्धी ॥ |आपल्या टीकांची केली प्रसिद्धी ॥ तथापि नाही झाली अर्थसिद्धि || यथार्थगीता रहस्याची ॥ २७ ॥ आणखीः - -- पुण्य आणि पाप ॥ दोनीही अविद्यारूप ॥ कर्मध मैदाहक स्वरूप | ज्ञानाभि हा ॥ १४९ ॥ धर्म ह्मणतां पुण्य कर्म || ज्ञानीं नलगे तो धर्म ॥ या धर्म्यपदाचें न । कळोनि वर्म ॥ प्राकृत टीकाकार धर्म्य इतकेंचि बो- लती ॥ १५० ॥ वरील लेखांत प्राकृत टीकाकारांच्या नांवाचा उल्लेख स्पष्ट नाहीं व बहुवचनीं प्रयोग योजिलेला आहे यामुळे