पान:वामनपंडित १८८४.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

• समाधान केलें आहे को शब्देकरून हठयोग घ्यावा तर, शरीरास अजरामात्व आपात त्यायोगे बेहाचा लोभ वाढवावा, असा गीतेचा हेतु नाही. यास्तव सगुणध्यान- परच अर्थ लाविला पाहिजे. या वामनाच्या ह्मणण्याचें खंडणही सहज होतें. युक्ताहारविहारादि गोष्टी शरीर- सुखार्थ सांगून, त्यापासून योगसुख गीतेंत पुढेंच सांगितलें आहे. व त्याची टीका करितेवेळी वामनानें झटले आहे कीं, आहारविहारांत न्यूनाधिक झालें असतां शरीरास विकृति व असुख होऊन योग साधणार नाहीं. यास्तव शरीराची सुयंत्रता राखिली पाहिजे. यावरूनच जर योगानें शरीरास अजरामरत्व येतें असें वामनानें मानिलें आहे, तर तशा योगाचा अभ्यास करून शरीराची नि- रंतर सुयंत्रता सिद्ध करण्यांत जड देहाचा लोभ केला असे होत नाहीं. एकदा योगाभ्यासानें शरीर अजरामर झालें, ह्मणजे पाहिजे तसे सगुणध्यानादि ईश्वरोपासनेकडे त्याची योजना करण्यास कोणतीही हरकत राहणार नाहीं. मग ईश्वराशी योग होण्याकरितां निर्वेध व नि रुपाधि शरीर बनविण्याचा जो वज्ज्रासनगौणनांवाचा योग ज्ञानेश्वरानें सांगून, योग शब्दाची व्याख्या केली आहे, ती वामनाच्याही एकंदर अभिप्रायानें यथार्थ नाहीं असें सिद्ध होत नाहीं. असो. आतां या संचधानें वामनपंडित आणि ज्ञानेश्वर या ग्रंथकारांची व्याख्या मासल्याकरितां एथें देणें अवश्य आहे. तथापि वर दिलेल्या सर्व श्लोकांवरील संपूर्ण व्याख्या देण्यास अवकाश नसून तशा सर्व व्याख्येची KASHINATH G. MARATHE. 1 BHOR