पान:वामनपंडित १८८४.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रधानभूत: नाहीं, पाहिजे त्या ठिकाणी केव्हांही भगव- चितन करण्यास हरकत नाहीं; त्याप्रमाणेच सगुणध्यान करण्यास देशकालाची आवश्यकता नाहीं. तशांत ज्या गीतारूप लहानशा पात्रांत योगाचें विशदस्वरूप सांठ- विण्यास जागा नव्हती; तेथें सगुणध्यानाचा, देशासनादि अप्रधानविधि विस्तारानें सांगण्यास जागा झाली, ही कल्पना युक्तीस बरोबर दिसत नाहीं. ! दुसरें, योगशब्दाचा अर्थ ध्यान असा आहे; परंतु तो “सगुणभ्यान” असा योगशास्त्रांत मानित नाहींत. योग शब्दाचा सगुणध्यान असाच अर्थ जर भगवान् श्रीकृष्ण यास इष्ट असता, तर तशी गीतेंत स्पष्टता करण्यास त्याला शब्दाची उणीव होती असेंही नाहीं. तिसरें, योगशास्त्रांत योग शब्दाचा मुख्यार्थ:-“योग- चित्तवृत्तिनिरोधः” भ० पतंजलि. “संयोगो योग इत्युक्तो जीवात्मपरमात्मनो: " भ० याज्ञवल्क्य. “योगः समाधिरिति । समाधिः समतावस्था जीवात्मपर- ‘‘मात्मनोः। ब्रह्मण्येव स्थितिय सा समाधिः प्रत्यगात्मनः ॥ भगवान् व्यास. याप्रमाणें केवळ चित्तवृत्तीचा यमनियमादि उपायांनी निग्रह करणें तो योग; किंवा जीवात्मा आणि परमात्मा यांचा जो संयोग तो योग; असा योगशास्त्रांत अर्थ आहे. तेव्हां वामनानें जी सगुणध्यानाथ योग शब्दाची योजना केली आहे ती अयथार्थ असावी असे वाटतें. वामनानें या विषयावर टीका करतेवेळी असे शंका-