पान:वामनपंडित १८८४.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३९ ) एकदेश ही दाखविला नाहीं. केवळ सगुणध्यान कर ण्याकरितां वरील श्लोकांत सांगितलेला देश आसनादि प्रकार आहे, असा अभिप्राय व्याख्येंत दाखविला आहे. • तेव्हां यासंबंधे ज्ञानेश्वरी यथार्थ किंवा यथार्थदीपिका यथार्थ हें पाहिले पाहिजे. भगवद्गीतेस योगशास्त्र ह्मटलें आहे; योगक्रियेनें शरीरावर कांहीं व्यापार घडला अ- सतां अंतःकरणास विलक्षण शक्ति येऊन जगद्व्याप कत्वही प्राप्त होतें. हें सांप्रतच्या मिसमेरीझमच्या प्रयो- गावरून आपणास प्रत्यक्ष दिसतें. व अध्यात्मविद्येचें मुख्य फल विश्वव्यापकता हें आहे असे पुष्कळ ठिकाणी आढळतें. तेव्हां ज्ञानेश्वरानें मूळबंधादि योगमार्ग आणि त्यायोगें शरीरासह मनाचें होणारें विलक्षण स्थित्यंतर जें सांगितलें आहे, तें भगवद्गीतेतील मूलाभिप्रायास अ नुसरून यथार्थ आहे असे वाटतें. परंतु वामनानें त्या श्लोकांचा सगुणभ्यानपर जो अर्थ केला आहे तो यथार्थ आहे असे वाटत नाहीं. कारण सगुण ध्यान करण्यास, देश, आसन मुद्रा इत्यादि खटा- टोपाची गरज नाहीं. व इतका खटाटोप असणें हें स- गुणध्यानाभ्यासास यद्यपि प्रतिकूलही नाहीं; तथापि भगवञ्चितन करण्यास देश, काल, आसनादि विधि जसा १ मोरोपंतानें ज्ञानेश्वरीची महती मोठीच वर्णिली आहे. "श्री ज्ञान- देव साक्षात् भगवान वैकुंठनाथ अवतरला || एतत्-कृत-गीतार्थ-व्या- ख्याने फार लोक भव तरला || 3 || भाषाग्रंथीं यात्री तुळा नये आणिकांसि या लोकीं ॥ प्रतिभा धरूं करातें कविवर्महि सर्व किक- रचि हो कीं ॥ ४ ॥ 15. MAY 2007 'भग आर्या.