पान:वामनपंडित १८८४.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३८ ) योग सांगितले आहेत, त्यांजवरील टीका करितेवेळीही वामनानें सगुणभक्तिपरच त्यांचा अर्थ लाविला आहे. हें भगवद्गीता अध्याय ६ श्लोकः-- शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः नात्युछ्रितं नातिनीचं चैलाजिनकुशोत्तरम् ॥ ११ ॥ तत्रैकाग्रं मनः कृत्वा यतचित्तेंद्रियक्रियः उपविश्यासने युंज्याद्योगमात्मविशुद्धये ॥ १२ ॥ समं कायशिरोग्रीवं धारयन्नचलं स्थिर: संप्रेक्ष्य नासिकाग्रं स्वं दिशश्चानवलोकयन् ॥ १३ ॥ प्रशान्तात्मा विगतभीब्रह्मचारिव्रते स्थितः मनः संयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्परः ॥ १४ ॥ यांवरील वामनपंडिताची व्याख्या पाहिली झणजे दिसतें. वरील श्लोकांत सगुणमूर्तीचा कांहीं उल्लेख न सून, भगवद्गीतेवरील ज्ञानेश्वरीनामक टीकेंत ही वरच्या श्लोकांचा अर्थ योगपरच केला आहे. वरच्या श्लोकांवरील ज्ञानेश्वरीटीकेंत मूळबंधनामक योगाच्या, देश, आसनविधि इत्यादि क्रिया बारीक बा - रीक तपशीलवार सांगून, अखेरीस योगाभ्यासानें जें देहाचें चमत्कारिक अवस्थांतर होतें तें अतिमनोवेधक व अद्भुत वर्णिलें आहे. योगाभ्यासानें पासून मनुष्यांपर्यंत सर्वांचें अंतःकरण ण्यावर जमिनीप्रमाणे पायांनी चालतां येतें; आकाशांत केवळ शरीरानें पाहिजे तसें गमन करितां येतें. इत्यादि अनेक अलौकिक सामर्थ्ये येतात असे सांगितले आहे. परंतु वामनाने व्याख्या करितेवेळी अशा योगाचा ब्रह्मांडांतील मुंगी- जाणतां येतें; पा-