पान:वामनपंडित १८८४.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

टीका || ऊर्ध्वकाळे करूनि ॥ जैसा पिता ऊर्ध्व पुत्रा- हुनि || तैसें प्रपंचापूर्वी ब्रह्म म्हणोनि || ऊर्ध्व शब्दे परब्रह्म ॥ ३० ॥ त्या ऊवीं ब्रह्मीं ॥ मूळमाया अश्व- त्थाचें ह्मणे जगत्स्वामी ॥ तें मूळ तों माया ह्मणूनि निग मागमीं ॥ प्रसिद्ध असे ॥ ३१ ॥ माया ब्रह्मीं प्रगटते || ते माया ब्रह्मींच असते ॥ त्याच्या प्रकाश प्रकाशते ।। अनंत ब्रह्मांडरूपिणी ॥ ३२॥ किरणीं उठे जळाभास || ठाव त्यावांचूनि कैचा तयास | किरणावांचूनि कवणास ॥ दिसेल उदकभांस तो ॥ ३३ ॥ मध्यान्हीं कार्यरूपें दिसे || सायान्हीं कारणत्वें किरणीं वसे | पुन्हा दुसरे दिवशीं गवसे || मध्यान्ह होतां ॥ ३४ ॥ प्रातःकाळी सायान्हीं ॥ न ह्मणवे किरणीं नाहीं ह्मणोनि ॥ जरी नाहींच तरी कोठुनि || मध्यान्ह होतां प्रगटे ॥ ३५ ॥ तरी कां मध्यान्हावांचूनि न दिसे ॥ ह्मणूनि पुसतील जें ऐसें ॥ त्यास सांगावें कीं वसे || किरणींच कारणरूपें इ- तरकाळीं ॥ ३६ | परंतु कारणरूपें करुनि || किरणींच आहे अरूप होऊनि ॥ कार्यरूपें त्याचपासूनि ॥ प्र- गटे असे त्याच मध्ये ॥ ३७ ॥ दुधीं दिसेना घृत ॥ तथापि आहे निश्चित |॥ कीं निघे होतां मथित ॥ न दिसे तरी आहे ह्मणावें ॥ ३८ ॥ तैसी माया प्रळयकाळीं ॥ असे निर्धम केवळीं ॥ सृष्टिकाळी त्याची निष्कळीं ॥ ते प्रगटते असते लय पावते ॥ ३९ ॥ ब्रह्मींचं ते वसे ॥ प्रपंच तीपासूनि होतसे ॥ यालागि तेचि माया येथे ग वसे || प्रपंचाश्वत्थ मूळही ॥ ४० ॥ ऐसी माया अश्वत्थ मूळ ॥ ते ऊर्ध्वं असे ह्मणे मेवनीळ ॥ ऊर्ध्वशब्दें ती परतें पलीकडे केवळ | अधिष्ठान तैं मायेचें ॥ ४१ ॥ ●