पान:वामनपंडित १८८४.pdf/३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रस्तावना. वामनपंडित हें नांव विशेषेकरून महाराष्ट्र लोकांत काशीपासून रामेश्वरापर्यंत गाजत आहे. ह्या प्रचंड वि- द्वानाच्या विशाल कीतींचे अत्यंत शुभ्र किरणच असे, त्याचे शतशः ग्रंथ चोहींकडे पसरले असून, ते जगांतील अज्ञानतमास दूर करीत आहेत. अशा पुरुषाचें चरित्र वे कृत्य अवलोकन करण्याची इच्छा प्रत्येक जिज्ञासूस होणें साहजिक आहे. तशांत याच पुरुषाचें चरित्र आणि ग्रंथ यांजविषयीं कोणी निबंध लिहिला व तो पसंत ठरला तर इनाम दिले जाईल, अशी पुणे एथील दक्षिणा मैज् कमिटीनें जाहिरात प्रसिद्ध केली. हें पर्व पाहून मी वामनपंडिताच्या ग्रंथोदधींत मज्जन केलें, आणि यद्द- च्छेनें जो मुक्ताफलांचा लाभ झाला त्यांचा निबंध करून तो त्या कमिटीपुढें ठेविला. त्याचा त्या कमिटीनें सादर स्वीकार केल्यामुळे, तो विद्वज्जनांच्या अनुग्रहास पात्र आहे असे अनुमान करण्यास जागा झाली. या निबंधांत, षामनपंडिताचें उपलब्ध चरित्र, त्याच्या ग्रंथांचें सामान्य स्वरूप, त्याच्या ग्रंथांचे गुणदोष, आणि त्याची व मोरोपंताची, ग्रंथरचना आणि कवित्व- शक्ति या संबंधानें तुलना, अशा विभागांनीं विवेचन केलें आहे. 16 MAR 1990