पान:वामनपंडित १८८४.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

{ ३४ ) विस्तारेंकरून दाखविण्यास ह्या लहानशा निबंधांत स्थलावकाश नाहीं. तथापि ग्रंथसंबंधी, कवितेसंबंधी व भाषेसंबंधी पुष्कळ चांगल्या गुणांनी ही टीका इतकी उ त्तम झाली आहे कीं, वामनाचे दुसरे कोणते ही ग्रंथ न पहातां फक्त ह्या टीकाग्रंथावरूनच जरी पाहिले तरी, वा- मनाची विशाल व कुशाग्रबुद्धि, त्याचें सरल, सोपें, मधुर व भेदक व्याख्यान, त्याची तत्वजिज्ञासा व अ- नन्यभक्तीची अप्रतिम प्रीति, त्याचे व्यापक विचार आणि अतिमोठी विद्वत्ता, हे गुण स्पष्ट झाल्यावांचून राहत नाहींत. आतां मासल्याकरितां चांगल्या व्याख्येचीं एक दोन उदाहरणे दाखवितों त्यांवरूनही गुणांचें कांहीं दिग्प्रदर्शन होईल. श्लोक. प्रकृतिं स्वामवष्टभ्य विसृजामि पुनःपुनः । भूतग्राममिमं कृत्सामवशं प्रकृतेर्वशात् ॥ ८ ॥ टीका || अगा आपली प्रकृती || अधिष्वनि तीतें मी जगत्पती || पुनःपुनः हा भूतांचा ग्राम येरिती ॥ मी निर्मितों ॥ ५१ ॥ प्रकृती अधिष्ठनि निर्मितों ह्मणे ॥ तों अर्जुनास खूण बाणे ॥ विवर्तातें अधिष्ठी अधिष्ठान हें जाणें ॥ पात्र भगवत्कृपेचें ॥ ५२ ।। रज्जु अधिष्ठी स पीतें || शुक्त अधिष्ठी रुप्यातें ॥ तंतु अधिष्टी पटातें ॥ घटातें मृत्तिका || ५३ || हे कार्यरूपिणी प्रकृती ॥ सू- चवी मायाधिपती ॥ प्रळयानंतर जगत्पती || योगनिद्रा . करी तेव्हा हे नसे ॥५४ || रज्जूवरी सर्प दिसे ॥ तेव्हां की द्रष्टा असे ॥ कर्तयाविण न भासे || पट तंतूत घट मृत्तिकेंत ॥ ५५ ॥ जे प्रळयकाळी नव्हती ॥ ते सृष्टि-