पान:वामनपंडित १८८४.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३२ ) आझास समजलें आहे की, श्रीकाशीक्षेत्री सांप्रत जागे- श्वर नामें मोठा पंडित आहे. त्यास संस्कृत उत्तम येत असून, अध्यात्मविचारांतही तो निष्णात आहे. त्याला अवलोकन करण्यास संस्कृतभांडारांत असंख्य ग्रंथरत्नें पडली असतां तीं सर्व एकीकडे ठेवून, तो वारंवार ह्याच प्राकृतदीपिकेचें अवलोकन करितो, आणि ह्मणतो की गूढ गीतार्थांचें, यथार्थदीपिकेनें जसें प्रकाशन होतें तसें दुसऱ्या टीकांनी होत नाहीं. अहाहा ! या टीकेस य थार्थदीपिका हें नाम अन्वर्थक खरें !!! सर्वच संस्कृतज्ञ न्यायदृष्टीनें यथार्थदीपिकेचें अव- लोकन करितील, तर त्यांजलाही जागेश्वरपंडिताप्रमाणेंच तिची महती वाटेल यांत कांहीं संशय नाहीं. भगवद्गीतेचा वास्तविक अर्थ दाखविणें व त्यांत नि गुण सगुणाचे ऐक्य राखून भक्तिमाहात्म्य वाढविणें हे हेतु आपली शक्ति चालेल तेथपर्यंत वामनानें तडीस नेले आहेत. आतां त्याची टीका सर्वत्र मूळग्रंथाभि- प्रायास धरून उत्तम साधली आहे, हें खरें आहे; त- /थापि चराचरमय विश्व आणि ईश्वर यांत अभेद आहे ही गोष्ट निरंतर त्याच्या मनांत घोळत असल्यामुळे, टीका करितेवेळी हेतूच्या उद्गाररूपानेंच जी व्याख्या वा- हेर पडली, तिच्या योगानें ग्रंथाच्या सरल अर्थाहन भिन्न प्रकारें लांबलचक व्याख्यानही कोठें कोठें झालेले आढळतें. ततः श्वेतैर्हयैर्युक्ते महतिं स्यंदने स्थितौ । माधवः पां- डवश्चैव दिव्यौ शंखौ प्रदध्मतुः ॥ १४ ॥ त्यानंतर ह्मणे संजय ॥ ज्यास यशवर्ण श्वेतहय ||