पान:वामनपंडित १८८४.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

चामल पर काय ? येणार नाहीं. मग अमुक भाषा चांगली व अ- मुक वाईट असे मानणें वृथाभिमानास दाखवितें. दुसरें, एकादा अतिमहत्वाचा विषय सर्व जगास सम- जावा आणि त्यायोगे जगदुपयोग व्हावा अशा औप- कारक बुद्धीनें एकादी ग्रंथरचना करावयाची आहे तर, ती ज्या लोकांकरितां करावयाची त्यांच्या अति साधा- रण भाषेतच केली पाहिजे. तेथें आपली विद्वत्ता दाख- विण्याकरितां लोकांशीं जिचा फारसा परिचय नाहीं अशा भाषेची योजना करणें अप्रयोजक आहे. इत्यादि कारणें मनांत आणून वामनपंडितानें जगदु- पयोगी टीका महाराष्ट्रभाषेंत केली आहे. वामनपंडित उत्तम संस्कृतज्ञ, अध्यात्मविद्या हा त्याचा अ त्यंत आवडता विषय, आणि सगुणभक्तीवर त्याचें म नस्वी प्रेम, या योगानें यथार्थदीपिकेंत गीतार्थाचें उत्तम व्यक्तीकरण झाले आहे. ही टीका प्राकृतभाषा जाण- णारे लोकांस यथार्थत्वानें, श्रुतिप्रमाणांनी आणि चम त्कारिक कल्पनांनी आनंददायिनी होते इतकेंच नाहीं; "तर प्राकृतभाषेकडे पाहून नाक मुरडणारे संस्कृतज्ञ महापंडितांच्याही ती तसीच आनंदवर्धिनी आहे असे अनुभवास येतें. कविचूडामणि मोरोपंत यानें भगवद्गीतेवर आर्या- छंदांत लहानशी टीका केली आहे. तींत या व्याख्ये- विषयीं:- “ श्रीमद्भगवद्गीताव्याख्यानीं हृदयहारि-वचनांहीं || “श्रीज्ञानदेव वामन पटु ऐसा अन्य मानवच नाहीं ॥ २ ॥ असें झटलें आहे. याशिवाय चांगल्या आधारावरून KASHINATH G. MARATHE. 1 BHOR -