पान:वामनपंडित १८८४.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३० ) "तेच्या अंती चक्रपाणी ॥ ऐसेंचि बोलिलासी ॥१११॥ "कोण्या मिसें तरी कोणी ॥ गीतार्थ अन्यथा वाखाणी || “मज नावडे ती थोराची ही वाणी || काय करूंजी श्री- "कृष्णा ॥ ११६ ॥” यावरून वामनपंडितानें भक्तीला केवढ़ें महत्त्व दिलें आहे हे वाचकांच्या ध्यानीं येईल. वामनपंडित संस्कृतभाषेंत पंडित होता. व तो होता त्या काळच्या लोकांच्या समजुतीप्रमाणे प्राकृत भाषेत ग्रंथरचना करणें हें हलकट काम आहे असे पंडितजन समजत होते. असे असतां वामनानें प्राकृतभाषेवर आपली इतकी प्रीति प्रदर्शित केली आहे कीं, श्रुति- सम मानिलेली जी भगवद्गीता तिजवरील भाष्यामृत सां- 'ठविण्यास त्यानें प्राकृतपात्राची योजना केली व त्यां- तही अगदी प्राकृतांचा प्रवेश होण्यासारखी सुगमता व्हावी अशी तजविज ठेविली आहे. 66 जेथोनि टीकेचा आरंभ || तेथूनि गीतार्थ जो स्व- “यंभ ॥ तो होय अत्यंत सुलभ ॥ शब्द ऐसे योजितों २ ० " यथार्थदी० अ० ९. यावरून वामन मोठा दूरदर्शी, निरभिमानी व सत्य- प्रिय होता असें झटलें पाहिजे. कारण, कोणत्याही विचाराचें महत्त्व संस्कृतादि भाषांच्या संबंधानें न्यूना- धिक होत नाहीं; तर प्रतिपादन करणाऱ्या मनुष्याच्या बुद्धिवैभवाप्रमाणें ते विचार सरस, निरस, उदात्त किंवा ग्राम्य होतात. सोन्यासारखी संस्कृतभाषा आहे पण तीत जर पोरकट किंवा बीभत्स विचार भरून ठेविले, तर संस्कृतभाषेमुळे त्यांस प्रौढी किंवा शालीनता येईल