पान:वामनपंडित १८८४.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २८ ) " केली श्रीगीतेची व्याख्या बहु भक्ति जींत गाजवि- ' ली || साजविली साधुसभा भाषाकविकवनशक्ति ला- “ जविली " ॥ ५ ॥ 66 वामनपंडितस्तुति. . सगुणभक्तीचें माहात्म्य नकळतां लोक भगवद्गीतेचा अर्थ करितात यामुळे त्यांजकडून चुका होण्याचा सं- भव आहे. तो अनर्थ टाळण्याकरितां भगवद्गीतेवर टीका करावी, असें माझ्या मनांत पुष्कळ दिवस होतें; व शि- प्यमंडळी, साधुसंत, योगी इत्यादि लोकांनींही सांगि- तलें कीं, जगास उपयोगी होईल अशी भगवद्गीतेवर टीका करावी. परंतु भगवान् श्रीकृष्ण अनुमोदन देईल तेव्हांच टीका करूं असा भाव वरून राहिलों. श्रीकृ- प्णाचें प्रत्यक्ष अनुमोदन दिसलें नाहीं. तथापि तोच बुद्धीचा प्रेरक आहे. तेव्हां टीका करण्याविषयीं जी आपल्या बुद्धीला प्रेरणा झाली हीच त्याची आज्ञा सम- जून टीकेला आरंभ केला; इत्यादि उद्देश ग्रंथारंभीच वामनानें दाखविला आहेः- “ब्रह्मविद्येचें वैभव ॥ ऐसा सगुणभक्तीचा अनुभव ॥ गीतेंत थोर हा अनुभव ॥ “ सर्वत्र असे वर्णिला ॥ २५ ॥ ऐसें ब्रह्म तेंचि सगुण ॥ ऐसा ज्ञाननिष्ठ भक्त निपुण ॥ भगवंत भागवत ऐसी "खूण | जेथें वेगळी न सांपडे ॥ २६ ॥ सगुण ब्रह्म चराचर || "गीतेंत या ज्ञानाचा आदर || ह्मणूनि धर्म्यपद वारंवार ' या ब्रह्मज्ञानी योजिलें ॥ २७ ॥ “ प्रत्यक्षावगमं धर्म्यं ससुखं कर्तुमव्ययम् 66 " अध्याय ९ " 66 " ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते' अध्याय १२.