पान:वामनपंडित १८८४.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २४ ) धरि नसोनिहि रज्जु भुजंगमा । धरि अशारिति जो स्थिरजंगमा || उखळ-रज्जु तथा प्रभुच्या कटीं । भ्रम हरी हरितो भवसंकटीं ॥ स्वगति दे अतिदुष्ट अवासुरा । स्मर मना दृढ त्या अनघा सुरा ॥ प्रभु ऋणी जरि दे परमागती । स्वपद-दास्यचि ते नर मागती ॥ फणिफणावरि नृत्य करी हरी । प्रकृति जो भवबंध करी हरी ॥ त्रिभुवनीं जनि काननिं दीसतो । स्मर मना प्रभु यामिनिदीस तो ॥ त्रिभुवनीं जगजीवन दीसतो । करि कृपा यमुनाख्यनदीस तो ॥ मथुनियां भुजगा अति काळया । दवडि तेथुनि दुर्मतिकाळया || उखळबंधन. वनसुधा. हरिविलास ( कालियमर्दन ). वामनाच्या ग्रंथांचा विषय सगुणअवतारांच्या लीला, साधुचरितें, आणि अध्यात्मविद्या यांतून त्याचा अ.. त्यंत प्रियविषय अध्यात्मविचार होय. त्यानें अध्यात्म- विद्येवर पुष्कळ ग्रंथ लिहिले आहेत. आत्मज्ञान विषय स्वभावतः दुर्बोध असतां त्यानें तो अनेक दृष्टांतांनीं सु- बोध करून दाखविला आहे.