पान:वामनपंडित १८८४.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २२ ) मावळून, सात्विकभाव उत्पन्न होऊं लागतात; यामुळे मन निर्मळ होऊन ग्रंथांत मार्दव, माधुर्य, प्रसाद हे गुण सहज येतात. तिसरें, अनंतकालानंतर अशा ग्रंथांच्या अवलो- कनानें, प्राचीनकालीं ईश्वरभक्ति कितपत जागृत होती हें समजण्यास साधन होतें. याशिवाय ईश्वराविषयीं कृतज्ञता व पूज्यत्वबुद्धि प्रकट केल्यानें अंशतः कृतार्थ झाल्याचा निर्मलानंदही होतो. याप्रमाणें मंगलाचरणापासून पुष्कळ हित आहे यांत कांहीं संशय नाहीं. आतां कित्येक नास्तिकमताचे अथवा अभक्तिमान्लोक, मंगलाचरण करणें हें का- लाचा व्यर्थ व्यय करणें आहे असें कदाचित् मानितील; परंतु मनुष्य कितीही ज्ञानी असो तो भक्तिमान् नसेल: तर त्याला कधीं समाधान होणार नाहीं. ह्या सिद्धांता- प्रमाणे भक्तीचें लक्षण मनांत आणिलें ह्मणजे मंगलाच- रणांत जो ग्रंथकाराचा काल गेला तो कालाचा अत्यंत उपयोगी व्यय झाला असे मानण्यास कांही हरकत नाहीं. वामनाच्या कितीएक ग्रंथांतील मंगलाचरणें एथें मां- सल्याकरितां दिलीं आहेत. " वंदूनियां जलविजापतिच्या पदातें । " वर्णीन त्या हरिचिया तनुसंपदातें ॥” ध्यानमाळा. वंदोनियां स्थिर-चरात्मक वासुदेवा । ध्यानीं फणींद्र-शयनीं जगदात्मदेवा ॥