पान:वामनपंडित १८८४.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २१ ) स्थिति चांगली सांवरली नव्हती. ती उणीव वामनाच्या वाणीनें बरीच दूर केली. वामनानें लहान लहान तत्त्व- ज्ञानाचींच परंतु स्वतंत्र अशीं वरींच प्रकरणें रचिलों. संस्कृतभाषेतील छंदाप्रमाणें महाराष्ट्रभाषेंत छंद उतर- ण्याचा मनोहर उद्योग केला. तच्वजिज्ञासु व भक्तिमान् या दोन्ही वर्गांतील लोकांस आनंद व विश्रांति होण्या- सारखे वामनानें आपले सर्व ग्रंथ रचिले आहेत. आ मच्या देशांतील वक्ते झणजे हरिकीर्तन करणारे गोसांवी ह्यांच्या कीर्तनांतील रंगदेवतेस दिव्यतेज, तारुण्य, दर्य, आणि सुकुमारता देण्याकरितांच वामनानें आपला काव्यसुधाब्धि निर्माण केला असें ह्मटलें तरी चालेल. यावरून महाराष्ट्रभाषेवर व अर्थात् लोकांवरही वाम- नाचे फार उपकार झाले आहेत हैं उघड दिसतें. वामनाच्या प्रत्येक ग्रंथाच्या आरंभी बहुतकरून प रमात्म्यास वंदनरूप मंगलाचरण केलेले आढळतें. ही गोष्ट पंडितानें वृद्ध परंपरेनें ग्रहण केली असावी अथवा पंडित मोठा भगवन्निष्ठ होता यास्तव कोणत्याही का- मास प्रवृत्त होतांना भगवच्चरणीं लीन व्हावें हें त्यास स्वाभाविकच झालें होतें असेंही मानितां येईल. क- सेंही असले तथापि ग्रंथारंभी मंगलाचरण करण्याचा संप्रदाय तच्चतः फार चांगला आहे असे आह्मास वाटतें. ग्रंथारंभी मंगलाचरण केल्यानें ग्रंथास मंगलमुखता प्राप्त होते. तिजपासून ग्रंथ रचण्यास अथवा वाचण्यास आरंभ केल्याबरोबर कर्त्याच्या अथवा वाचकाच्या त्र- दयांत प्रेम आविर्भूत होऊन तो भक्तिमान् होतो. दुसरें, भक्तिमान् झाल्यानें मनाच्या तामसादि वृत्ति KACHINATH G. MARATHL - BHOR